अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं वजन बाळंतपणानंतर वाढलं होतं. पण त्यानंतर तिनं हे वाढलेलं वजन कमी केलं आणि ती पुन्हा स्लिम अँड ट्रिम झाली. पण हे तिच्यासाठी सोपं नाही पाहूयात काय आहे ऐश्वर्याचा डाएट प्लान...
ऐश्वर्या काळजीपूर्वक डाएट घेते. सकाळी उठल्या उठल्या ती लिंबू सरबत, मध पाण्यात टाकून पिते. ब्रेकफास्टला ती ओट खाणं पसंत करते.
ऐश्वर्या जंक फुड अजिबात खात नाही. रोज 8 ग्लास पाणी पिणं तिच्या तजेलदार त्वचेचं रहस्य असल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय ती फळं, ज्युस जास्त घेते.