मुंबई, 26 नोव्हेंबर : पंजाबची कटरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच शहनाज गिल. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओची कायमच चर्चा असते. तिचे फॅन्स तिला भेटण्यासाठी उतावळे होत असतात. अक्षरशः रडतात देखील. चाहत्यांचं असं प्रेम खूप कमी कलाकारांना मिळतं. शहनाजच्या बाबतीत पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे. बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेली शहनाज आता प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे. शहनाजचे देशातच नाही तर परदेशातही चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर शहनाज गिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या एका महिला चाहतीच्या एका कृतीने लक्ष वेधलं आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला चाहती शहनाजला मिठी मारून रडताना दिसत आहे. तिच्या आवडत्या स्टारला पाहताच ती भावूक होते आणि तिला मिठी मारून रडू लागते. शहनाज तिच्या चाहत्याला असे भावूक होताना पाहताच ती स्वतःही भावूक होते. विशेष म्हणजे गुडघ्यावर बसलेल्या या चाहतीने चक्क शहनाजला एक कडं आणि अंगठी गिफ्ट केली. एवढंच नाही तर तिने स्वतःच्या हाताने शहनाजच्या हातात ते कडं आणि अंगठी घेतली. यानंतर शहनाजने तिला उठवत प्रेमाने मिठी मारली. हेही वाचा - Vikram Gokhale Passes Away: असा नट पुन्हा होणे नाही! विक्रम गोखलेंच्या आठवणीत कलाकार भावुक
विरल भयानीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला भरपूर कमेंट आणि लाईक्स येत असून व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शहनाजसाठी काहीपण असं चाहती व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. ‘शहनाजचे खरे सपोर्टर, सनाच्या फॅन्सची गोष्टच वेगळी आहे, वी लव यू शहनाज, खरी स्टार, शहनाजने हे चाहते कमावले आहेत, तूझ्याविषयी रिस्पेक्ट आणखी वाढली’, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. काही क्षणातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
शहनाजही तिच्या चाहत्यांना खूप प्रेमाने भेटते. ती त्याला घट्ट मिठी मारते आणि मग त्याने दिलेले गिफ्टही स्वीकारते. शहनाजची ही स्टाईल पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत आणि तिला डाउन टू अर्थ स्टार म्हणत आहेत. शहनाजच्या प्रेमळ शैलीचे सर्वजण कौतुक करत आहेत.
शहनाज तिच्या चाहत्यांना प्रेमाने भेटण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये शहनाज तिच्या चाहत्यांना प्रेमाने भेटताना दिसत आहे. व्हिडिओवर कमेंट करत अभिनेत्रीच्या चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.