नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : Bigg Boss Marathi च्या घरातून काल तृप्ती देसाई घराबाहेर गेल्या. आता घरात 11 सदस्य उरले आहेत. नव्या आठवड्यात नवा गेम, नवा ट्विस्ट, नवे चॅलेंजेस पाहायला मिळतील. बिग बॉसच्या घरात आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा एक प्रोमोही समोर आला आहे. सध्याच्या आठवड्यात मीरा जगन्नाथ कॅप्टन आहे. तिला या ट्विस्टमध्ये घरातील एका सदस्याला घराबाहेर काढायचं आहे.
‘न भूतो न भविष्यति’ अशा या टास्कमध्ये मीरा कोणाला घराबाहेर काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आताच्या आठवड्यात जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये होते. तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील सदस्यांना अश्रु अनावर झाले.
दरम्यान, 19 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी सीजन 3 (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यात जय, सोनाली आणि तृप्ती देसाई हे तीन जण नॉमिनेट झाले होते. त्यानंतर तृप्ती देसाई घराबाहेर जात असल्याची घोषणा करण्यात आली. आतापर्यंत अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, शिवलीला बाळासाहेब पाटील, आदिश वैद्य, तृप्ती देसाई घराबाहेर झाले आहेत.
100 दिवस एकत्र राहताना स्पर्धकांमध्ये झालेले वाद यापूर्वीच्या सीजनमध्ये चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच स्पर्धकांची परीक्षा सुरु होते. पहिल्याच दिवशीपासून या स्पर्धकांना घरात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी विविध टास्क पार करावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.