Home /News /entertainment /

Big Bossसाठी मालिका सोडली, पण आता पश्चाताप....; आदिशनं केला खुलासा

Big Bossसाठी मालिका सोडली, पण आता पश्चाताप....; आदिशनं केला खुलासा

आदिश वैद्यने 'बिग बॉस मराठी सीजन ३' मध्ये सहभागी होण्यासाठी 'गुम है किसीके प्यार में' (GHKKPM) हि मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाविषयी महत्त्वाची माहिती त्यानं दिली.

  कलाकाराने नेहमी सृजनशील असावं - अभिनेता आदिश वैद्य मुंबई, 04 जुलै: बिग बॉस मराठी फेम ( Big Boss Marathi)अभिनेता  अदिश वैद्य ( Adish Vaidya) प्रेक्षकांना  नवीन भूमिकेत पाहायला मिळत आहे. सब टीव्ही ( Sub TV) वरती नव्यानेच सुरु झालेल्या  'पुष्पा इम्पॉसिबल'( Pushpa Impossible) या मालिकेत आदिश दिसत आहे. आदिशनं आतापर्यंत 'तुमचं आमचं सेम असतं', 'रात्रीस खेळ चाले', 'झिंदगी न औत' यांसारख्या मराठी मालिका तर 'गुम है किसीके प्यार में', 'नागीन',  'बॅरिस्टर बाबू' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आदिश वैद्यने 'बिग बॉस मराठी सीजन ३' मध्ये सहभागी होण्यासाठी  'गुम है किसीके प्यार में' (GHKKPM) हि मालिका  सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तो आता पुन्हा एकदा  जेडी मजेठियाच्या 'पुष्पा इम्पॉसिबल' या मालिकेसह छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. एका मुलाखतीत आदिशला गुम है किसीके प्यार में हि लोकप्रिय मालिका सोडण्यामागचे कारण विचारले. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार,  तो म्हणाला,  'हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. पण एक अभिनेता म्हणून मला माझ्यातील कलेला विकसित करायचं होत. मी काय काय करू शकतो हे तपासायचं होत. आणि कलाकाराने नेहमीच सृजनशील असावं असं मला वाटतं. त्यामुळे कलाकार म्हणून कुठलीच संधी मी शक्यतो सोडत नाही.  बिग बॉस  मराठी असेल किंवा वेब सिरीज असतील त्यात मला स्वतःला एक्‍सप्‍लोर करण्‍याची आणि परफॉर्मन्स-ओरिएंटेड कॅरेक्‍टर्स साकारण्याची  संधी  मिळाली जी  एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी गरजेची असते. त्यामुळे  गुम है किसीके प्यार में GHKPM हि मालिका सोडण्याच्या निर्णयाचा मला कधीच पश्चाताप होत नाही. उलट त्यामुळे नवनवीन भूमिका करायला मिळाल्या याचा आनंदच वाटतो असं यावेळी आदीशने सांगितलं.  तसेच,  भविष्यातही अशाच  विविधांगी भूमिका करेन आणि स्वतःमधल्या कलाकाराला खुलवत राहील' असं ही आदिशनं सांगितलं. हेही वाचा - 'चला हवा...' मधून 'ही' अभिनेत्री होणार गायब? करणार देवमाणूसमध्ये एंट्री
  आदीश वैद्य आता बऱ्याच काळानंतर  पुष्पा इम्पॉसिबलसह टेलिव्हिजनवर परतला आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल आदिश सांगतो कि, 'या मालिकेची नायिका पुष्पा  हि एक सर्वसाधारण घरातील अडाणी बाई आहे जिला शिक्षण घेण्याची इच्छा आहे. तिचा गुरु आणि मार्गदर्शक अशी भूमिका मी साकारत आहे'. पुष्पा इम्पोसीबल ही मालिका सब टीव्हीवर 6 जून पासून सुरू झाली आहे.  आदिश वैद्यसह करूणा पांडे, गरीमा परिहार, नवीन पंडिता हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आदिश  बिग बॉस मराठीसह  अनेक वेब सिरींजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच येणाऱ्या काळात तो प्रसिद्ध दिगदर्शक  रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सिरीजमध्येही झळकणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Big boss, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या