Home /News /entertainment /

Bhool Bhulaiyaa 2 मध्ये 'छोटे पंडित' दिसणार; मग अक्षय कुमार-विद्या बालनचा पत्ता का केला कट?

Bhool Bhulaiyaa 2 मध्ये 'छोटे पंडित' दिसणार; मग अक्षय कुमार-विद्या बालनचा पत्ता का केला कट?

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/कियारा अडवाणी

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/कियारा अडवाणी

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2 Trailer) चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे.

  मुंबई, 26 एप्रिल: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2 Trailer) चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या (Akshay Kumar Bhool Bhulaiyaa) 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये तर कमाल केलीच होती, पण त्यानंतर टेलिव्हिजनवरही प्रेक्षकांच्या आवडीचा सिनेमा आहे. यात अक्षय कुमारसह विद्या बालन (Vidya Balan Bhool Bhulaiyaa) देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अर्थात 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी (Kartik Aryan and Kiara Advani Bhool Bhulaiyaa 2) यांनी अक्षय कुमार आणि विद्या बालन यांना रिप्लेस केले आहे. यामध्ये तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. अनीस बज्मी (Anees Bazmee) दिग्दर्शित चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या सिनेमाचा ट्रेलरही चाहत्यांना आवडत आहे. मात्र असे असले तरी चाहते अक्षय आणि विद्याला मिस करतायंत हेही तितकच खरं आहे. आता या चित्रपटात पहिल्या भागातील कलाकारांना का कास्ट केले गेले नाही, याचा खुलासा दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी केला आहे. 'भूल भुलैया 2' च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अनीस बज्मी यांनी सांगितले की, राजपाल यादव वगळता सर्व नवीन लोकांना चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. हे वाचा-Tiger Shroff ला पाहून 'जबरा फॅन'ला आली चक्कर, 'हिरो'ने चाहतीसाठी केलं असं काही... पाहा VIDEO इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अनीस बज्मी म्हणाले की, अक्षय आणि विद्या या स्क्रिप्टमध्ये फिट बसत नव्हते. ते म्हणाले की, 'अक्षय कुमार खूप चांगला अभिनेता आहे. आमची मैत्रीही चांगली आहे. माझी इच्छा होती, की त्याला या सिनेमात थोडावेळ तरी आणता यावे, पण स्क्रिप्टने संधी दिली नाही. त्याच्यासह एकत्र काम करताना खूप आनंद झाला असता, पण या चित्रपटात आम्ही अगदी वेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्टवर काम केले आहे. आम्ही राजपाल सोडून सगळ्यांना अगदी फ्रेश अप्रोचने कास्ट केले आहे.' आधीपेक्षा अधिक शक्तिशाली बनली मोंजोलिका या सिक्वेलमध्ये मोंजोलिका नेहमीपेक्षा अधिक शक्तिशाली बनल्याचे पाहायला मिळते आहे. 'भूल भुलैया 2' च्या ट्रेलरमध्ये मोंजोलिकाचे पुनरागमन दाखवण्यात आले आहे. ट्रेलरची सुरुवात एका भितीदायक हवेलीत होते, जिथे तब्बू दारात उभी राहून ती कुणाशी तरी बोलताना दिसते. तब्बू म्हणते की, 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा दरवाजा ठोठावण्यात आला आहे, यामागे कोणता सामान्य आत्मा नसून काळी जादू करणारी मोंजोलिका आहे.
  View this post on Instagram

  A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

  कार्तिक आर्यनची जबरदस्त एंट्री यानंतर एंट्री होते ती हिरो कार्तिक आर्यनची. ज्यात तो भुताखेतांमध्येच राहिल्या असल्याबाबत भाष्य करतो. ट्रेलरवरुनच लक्षात येत आहे की भूल भुलैया प्रमाणेच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांन हसवता हसवता घाबरवणार आहे. एकूण 3 मिनिटं 12 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सर्वांचाच जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Kartik aryan, Kiara advani, Vidya Balan

  पुढील बातम्या