मुंबई, 26 मार्च- Akanksha Dubey Live Video: भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं बनारसमध्ये एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आकांक्षा दुबेनं आत्महत्या का केली याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणाची पोलीस सध्या तपासणी करत आहेत. आकांक्षाच्या मृत्यूनंतर भोजपूरी कलाकारांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय तिच्या चाहत्यांना देखील याचा धक्का बसला आहे. सध्या आकांक्षाचा एक इन्स्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर देखील ट्रेंड होत आहे. आकांक्षा दुबेचा लाईव्ह व्हिडिओ होत आहे व्हायरल आकांक्षा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. आकांक्षाने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. यावेळीचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती रडताना दिसत आहे. ती तोंडावर हात ठेवून ढसाढसा रडत असल्याचेही देखील या व्हिडिओ दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला रडण्यामागचे कारण देखील विचारलं आहे. मात्र तिने त्यावर कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता तिच्या मृत्यूनंतर तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाचा- ‘जस्ट ट्राय….’ मृत्यूच्या काही तासापूर्वी अभिनेत्रीनं केली होती अशी काही पोस्ट याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा हिचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच तिच्या कुटुंबाला याची माहिती दिली आहे. तसेच आकांक्षा हॉटेलच्या ज्या खोलीत राहिली होती, तिथं कोणतीच सुसाईट नोट सापडलेली नाही. अशा स्थितीध्ये एकच अंदाज लावला जात आहे की, तिच्या मोबाईल फोनमधून काहीतरी माहिती मिळू शकते. कारण पोलीस सध्या तिच्या व्हाट्सअॅप चॅट आणि मेसेजची देखील तपासणी करताना दिसत आहेत. आकांक्षा शनिवारी रात्री एका बर्थडे पार्टीला गेली होती. त्यामुळे तिच्या फोनमधीसल मेसेजमधून ती कोणत्या बर्थडे पार्टीला गेली होती याची माहिती मिळू शकते. या पर्टीत असं काय घडलं ज्यामुळं या अभिनेत्रीनं असं टोकाचं पाऊल उचललं, असं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे पोलीस या सगळ्या प्रकरणाची कसून तपासणी करताना दिसत आहेय. वाचा- लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवलं आयुष्य, सिनेसृष्टीत धक्कादायक प्रकार 24 तासापूर्वी केली होती ही शायरी पोस्ट आकांक्षा दुबेने तिच्या इन्स्टा स्टोरीला 23 तासापूर्वी एक शायरी पोस्ट केली होती. यामध्ये असं म्हटलं आहे की, राह देखेंगे तेरी चाहे जमाना लग जाए,या तो आ जाए तू या हम ही ठिकाने लग जाए…अशाप्रकारची शायरी तिनं पोस्ट केली होती. आकांक्षा दुबेची शेवटची पोस्ट आकांक्षा दुबेनं तिच्या इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट भोजपूरी गाण्यावरची रील आहे. हा एक मिरर व्हि़डिओ आहे. हॉटेलमधील खोलीतच ही रील बनवण्यात आल्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिनं म्हटलं आहे की, जस्ट ट्राय.. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तिला प्रोत्साहन देण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
Bhojpuri actress Akanksha Dubey committed suicide by hanging herself in a hotel in Varanasi.
— News Factor India 🇮🇳 (Hinglish News) (@NewsFactorIndia) March 26, 2023
Akanksha came live on Instagram late last night, at that time she was crying.
Follow @NewsFactorIndia for more updates.#AkankshaDubey #UPNews #UttarPradesh #bhojpuriactress #bhojpuri pic.twitter.com/fC8IZ3W0cC
आकांक्षा दुबे तीन वर्षाची असताना आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या आई- वडिलांचं तिला आयपीएस करण्याचं स्वप्न होत. मात्र तिला बालपणापासून नृत्याची व अभिनयाची आवड होती. शिवाय तिला टीव्ही पाहायला देखील आवडत होतं. तिची हिच आवड ओळखून ती सिनेमा इंडस्ट्रीत आली. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेनं मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 व्या वर्षी आकांक्षा दुबेनं भोजपूरी सिनेमात पहिलं पाऊल ठेवलं. तिनं दिग्दर्शक आशी तिवारीसोबत काही सिनेमात काम केलं आहे. असं जरी असलं तरी तिला अनेकवेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. आकांशा 2018 मध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. यानंतर तिनं काही काळ सिनेमापासून लांब राहणं पसंद केलं.