मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवलं आयुष्य, सिनेसृष्टीत धक्कादायक प्रकार

लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवलं आयुष्य, सिनेसृष्टीत धक्कादायक प्रकार

भोजपूरी  इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा

भोजपूरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा

ही अभिनेत्री 2018 मध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. यानंतर तिनं काही काळ सिनेमापासून लांब राहणं पसंद केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च-भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं बनरासमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सारनाथ ठाण्याच्या क्षेत्रातील सोमेंद्र हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आंकाक्षा हिनं गळफास घेतला आहे. आकांक्षा भदोही जनपदमधील चौरी ठाणा परिसरातील परसीपूरची रहिवाशी होती. भोजपूरी इंडस्ट्रीतील आकांक्षा एक लोकप्रिय चेहरा आहे.

आकांक्षानं 'वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' यासारख्या सिनेमात काम केलं आहे. तिनं आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर भोजपूरी सिनेमा इंडस्ट्रीत दुखाचं वातावरण आहे. अभिनेत्रीच्या जाण्यामुळं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वाचा-माधुरीसारखी सेमटू सेम दिसणारी 'ही' अभिनेत्री करणार होती ‘हम आपके हैं कौन’ सिनेमा

आकांक्षा दुबे तीन वर्षाची असताना आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या आई- वडिलांचं तिला आयपीएस करण्याचं स्वप्न होत. मात्र तिला बालपणापासून नृत्याची व अभिनयाची आवड होती. शिवाय तिला टीव्ही पाहायला देखील आवडत होतं. तिची हिच आवड ओळखून ती सिनेमा इंडस्ट्रीत आली. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेनं मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 व्या वर्षी आकांक्षा दुबेनं भोजपूरी सिनेमात पहिलं पाऊल ठेवलं. तिनं दिग्दर्शक आशी तिवारीसोबत काही सिनेमात काम केलं आहे. असं जरी असलं तरी तिला अनेकवेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. आकांशा 2018 मध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. यानंतर तिनं काही काळ सिनेमापासून लांब राहणं पसंद केलं. ती म्हणाली होती की, नवीन कलाकारांना नवीन असल्यासारखी वागणूक दिलीच जात नाही. यामुळं लोकांचा स्वतावरचा विश्वासच उडतो.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment