मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षाने शेअर केलेला 'तो' व्हिडिओ; अभिनेत्रीच्या शेवटच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षाने शेअर केलेला 'तो' व्हिडिओ; अभिनेत्रीच्या शेवटच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

आकांक्षा दुबेची शेवटची पोस्ट

आकांक्षा दुबेची शेवटची पोस्ट

भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं बनरासमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकांक्षा दुबेची शेवटची पोस्ट आता समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च- Akanksha Dubey Death: भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं बनरासमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सारनाथ ठाण्याच्या क्षेत्रातील सोमेंद्र हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आंकाक्षा हिनं गळफास घेतला आहे. आकांक्षा बनारसमध्ये एका सिनेमाचं शुटींग करत होती. आकांक्षाचं आज एक नवीन गाणं लॉन्च होणार होतं. या गाण्यात तिच्यासोबत पवनसिंह (Akanksha Dubey Pawan Sing Song) होता. ‘ये आरा कभी हारा नहीं’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात तिचा बेधडक अंदाज पाहायला मिळत आहे. तिचं हे गाणं पाहून वाटतचं नाही की, या अभिनेत्रीनं आत्महत्या केली आहे. आकांक्षा दुबेची शेवटची पोस्ट आता समोर आली आहे.

आकांक्षा दुबेच्या (Akanksha Dubey) आत्महत्येनंतर तिच्या मित्रांना याचा मोठा धक्का बसला आहे. यावर कसा विश्वास ठेवायचा अशी स्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. तिनं आत्महत्या का केली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहे.

वाचा-गर्भपाताच्या दुसऱ्याच दिवशी शूटिंगवर बोलावलं,स्मृती ईरानींचा धक्कादायक खुलासा

आकांक्षा दुबेची शेवटची पोस्ट

आकांक्षा दुबेनं काही वेळापूर्वी एक पोस़्ट केली होती. तिच्या इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट भोजपूरी गाण्यावरची रील आहे. हा एक मिरर व्हि़डिओ आहे. हॉटेलमधील खोलीतच ही रील बनवण्यात आल्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिनं म्हटलं आहे की, जस्ट ट्राय.. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तिला प्रोत्साहन देण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by (@akankshadubey_official)

आकांक्षा दुबे तीन वर्षाची असताना आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या आई- वडिलांचं तिला आयपीएस करण्याचं स्वप्न होत. मात्र तिला बालपणापासून नृत्याची व अभिनयाची आवड होती. शिवाय तिला टीव्ही पाहायला देखील आवडत होतं. तिची हिच आवड ओळखून ती सिनेमा इंडस्ट्रीत आली. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेनं मदत केली.

>

मिळालेल्या माहितीनुसार, 17 व्या वर्षी आकांक्षा दुबेनं भोजपूरी सिनेमात पहिलं पाऊल ठेवलं. तिनं दिग्दर्शक आशी तिवारीसोबत काही सिनेमात काम केलं आहे. असं जरी असलं तरी तिला अनेकवेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. आकांशा 2018 मध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. यानंतर तिनं काही काळ सिनेमापासून लांब राहणं पसंद केलं.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Suicide