मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bhau Kadam : भाऊ कदम देणार विनोदाचा डबल डोस; धमाल विनोदी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Bhau Kadam : भाऊ कदम देणार विनोदाचा डबल डोस; धमाल विनोदी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Bhau kadam new movie

Bhau kadam new movie

भाऊ कदम यांनी आतापर्यंत 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून आपल्या विनोदाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता भाऊ कदमचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 16 ऑगस्ट : झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम यांच्या नुसत्या असण्यातून, चेहऱ्यावरील हावभावातून हास्य निर्माण होते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदमने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम यांना आपण अक्षय कुमार, शाहरुख, सलमान खानपासून  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ सगळ्या अभिनेत्यांच्या भूमिकेत पाहिलं आहे. पण आता भाऊ कदम एकदम नव्या कोऱ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. भाऊ कदम  एक नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे  प्रसिद्ध विनोदवीर भाऊ कदम. विशेष म्हणजे भाऊ कदम या चित्रपटातून कॉमेडीचा डबल डोस देणार आहेत. भाऊ कदम या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘घे डबल’ असे या चित्रपटाचे  नाव आहे. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे भन्नाट टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
‘घे डबल’ हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘घे डबल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् चित्रपटाचे निर्माते आहेत. हेही वाचा - Akshaya Deodhar and Hardeek Joshi : ठरलं! अक्षया हार्दिक 'या' चित्रपटात एकत्र झळकणार; सिनेमाचं पोस्टर रिलीज चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच 'घे डबल' हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. आणि मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !” भाऊ कदम यांनी याआधी 'पांडू', 'नशीबवान' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाले होते. त्यामुळे आता त्यांना ‘घे डबल’ या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेत.
First published:

Tags: Chala hawa yeu dya, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या