Home /News /entertainment /

असं काय झालं? कॉमेडियन भारती सिंहने हात जोडून मागितली माफी, तरीही FIR दाखल

असं काय झालं? कॉमेडियन भारती सिंहने हात जोडून मागितली माफी, तरीही FIR दाखल


असं काय झालं? कॉमेडीयन भारती सिंहने हात जोडून मागितली माफी, तरीही FIR दाखल

असं काय झालं? कॉमेडीयन भारती सिंहने हात जोडून मागितली माफी, तरीही FIR दाखल

कॉमेडीयन भारती सिंहच्या जुन्या व्हिडीओत तिने शिख समुदायातील लोकांच्या दाढी मिशांवरुन त्यांची खिल्ली उडवल्याचे म्हटले जात आहे. भारतीचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होताच भारतीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हात जोडून माफी मागितली.

  मुंबई, 17 मे -  कॉमेडीयन भारती सिंह (Bharti singh) आई झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. ती सतत तिच्या व तिच्या मुलाचे अपडेट तिच्या व्हिडीओ व्लॉग्समधून देत असते. मात्र भारती गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर हात जोडून माफी मागताना दिसत आहे. हर्ष आणि आपल्या मुलासोबत सतत आनंदी असणारी भारती अचानक हात जोडून माफी का मागू लागली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हात जोडून माफी मागितल्यानंतरही भारती विरोधात FIR का दाखल झाली? काय आहे प्रकरण जाणूया घेऊया. भारतीने तिच्या एका जुन्या शोमध्ये शिख समुदायातील लोकांच्या दाढी आणि मिश्यांवर खिल्ली उडवल्याचे म्हटले जात आहे. (Bharti Singh beard mustache comment) तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारती सिंह सतत नवीन कॉमेडी प्रेक्षकांसमोर आणत असते परंतु यावेळी तिचा जुना कॉमेडी व्हिडीओ तिच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भारती सिंह विरोधात आयपीसी कलम 295-अ अंतर्गत SGPCने FIR दाखल केली आहे. हेही वाचा -  'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस
   भारती सिंहने तिच्या जुन्या व्हिडीओमध्ये शिखांच्या दाढी मिश्यांवर विनोद केला होता. या विनोदावरुन शिख समुदायाच्या भावना दुखावल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणी अमृतसरच्या शिख संघटनेने भारती विरोधात प्रदर्शन केली होती. प्रकरण वाढल्याने भारतीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर सर्वांची हात जोडत जाहीर माफी मागितली.
  भारतीने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने म्हटले आहे की, "गेल्या 3-4 दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत ज्यात मी शिख समुदायातील लोकांच्या दाढी मिशांची खिल्ली उडवली असे म्हटले जात आहे. मी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की मी कोणत्याही धर्म किंवा जाती विरोधात भाष्य केलेले नाही. मी ना कोणत्या धर्मातीन ना पंजाबी लोकांची खिल्ली उडवली". भारतीने व्हिडिओत पुढे म्हटलेय, "मी माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होते.यातून कोणत्याही वर्गातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी मी हात जोडून माफी मागते. मी स्वत: पंजाबी आहे, अमृतसरमध्ये माझा जन्म झाला. मी त्यांचा नेहमी सन्मान करत आले आहे. मी पंजाबी असल्याचा मला गर्व आहे".
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Comedy actor

  पुढील बातम्या