मुंबई 12 जुलै: आपल्या सादरीकरणानं प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी भारती सिंग (Bharati Singh) देशातील एक आघाडीची स्टँड अप कॉमेडियन (Stand-up Comedian) आहे. पंजाबच्या भारतीनं विनोदाचं अचूक टायमिंग आणि सादरीकरणाची पध्दत यांच्या आधारे अल्पवधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत. छोट्या पडद्यावर भारतीनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विनोदी हास्य कलाकारांच्या यादीत भारतीचं नाव अग्रक्रमावर येतं. अगदी अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली भारती सिंग अनेक महिला स्टँड -अप कॉमेडियन्ससाठी प्रेरणा आहे. या क्षेत्रात फार मोजक्या महिलांना असं यश मिळालं आहे.
भारतीनं द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show), कॉमेडी नाईट्स हे शो गाजवले. आपल्या खास विनोदी शैलीत ती अनेक शोज तसंच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करते. सध्या ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया माधुरी दीक्षित परीक्षक असलेल्या ‘डान्स दीवाने -3’ या डान्स रिअॅलिटी शोचे (Dance Diwane-3) सूत्रसंचालन करत आहेत.
ओळखा पाहू यामध्ये सुहाना कुठली? शाहरुखच्या लेकीचे शॅडो फोटो पाहून चाहते चक्रावले
लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, भारती आणि हर्ष लिंबाचिया ही जोडी प्रेक्षकांची अतिशय आवडती जोडी आहे. सोशल मीडियावरही ही जोडी खूप अॅक्टिव असते. आपले मजेदार फोटो, व्हिडिओ ते शेअर करत असतात. नुकताच हर्षने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, त्यात भारतीला बघून चाहत्यांना धक्का बसला आहे.
समांतर 2ची निर्मिती कशी केली? समीर विद्वांसने सांगितल्या दिग्दर्शनातील अडचणी
View this post on Instagram
या व्हिडिओत भारती चक्क म्हातारी (Old) दिसत आहे. ती मोबाइलमध्ये काहीतरी बघण्यात गुंग असलेली दिसत आहे. तिचे केस पांढरे झाले असून, तोंडात दात नाहीत, चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत. या व्हिडिओत हर्ष, ‘म्हातारी झाली होती, तरीही तिची सतत मोबाइलची बघण्याची सवय सुटली नव्हती.’ असं सांगताना दिसत आहे, तो हे सांगत असतानाच भारती खोकू लागते. खोकताना म्हातारी माणसे ज्याप्रमाणे खोकतात तशीच तिनं अॅक्शन केली आहे.
हा व्हिडिओ बघून अवघ्या 37 वर्षांच्या भारतीची अचानक ही अवस्था का झाली या विचारानं चाहते अस्वस्थ झाले होते, मात्र हर्षनं लगेच याचा खुलासा करत काळजीचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हर्षनं इन्स्टाग्राम फेस फिल्टर वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. ‘प्रेम नेहमीच तरुण असतं, बायको म्हातारी होत असतं,’ अशी कॅप्शन त्यानं या व्हिडिओला दिली आहे.
या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, उस्त्फूर्तपणे ते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. भारती सिंगनं रसिकांच्या मनावर किती जादू केली आहे, याचीच प्रचीती यावरून येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy actor, Stand up comedy, Viral videos