मुंबई 03 ऑगस्ट: कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत येताना दिसत आहे. मालिकेत खोटी आणि खरी सुहानी अशा दोघीनी धुमाकूळ घातला असून मीनाक्षी आणि भास्कर यांना अखेर घरात राहणाऱ्या खोट्या सुहानीबद्दल सुगावा लागल्याचं समोर येत आहे. मालिकेत एवढा तणाव असताना मात्र मालिकेतील कलाकार चक्क एका ढिनच्यॅक गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. मालिकेतील कलाकार मीनाक्षी आणि भास्कर अर्थात भार्गवी चिरमुले आणि वरद चव्हाण हे साऊथच्या एका ठसकेबाज गाण्यावर मनमुराद नाचताना दिसून आले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सुद्धा बराच viral झाल्याचं समोर येत आहे. या मालिकेतील कलाकार नेहमीच वेगवेगळे bts धमाल व्हिडिओ शेअर करत असतात. मालिका जरी गूढ आणि रहस्यांनी भरलेली असली तरी ऑफ स्क्रीन कलाकार बरीच धमाल करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडिओतून भार्गवी आणि वरद यांना उत्तम नृत्य करता येतं हे तर दिसून येत आहे. भार्गवी चिरमुले ही तर एक उत्तम नृत्यांगना आहे यात वाद नाहीच. भारंगी नेहमीच सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिला अनेक पद्धतीचे नृत्यप्रकार जमतात हे अनेकदा दिसून आलं आहे. हे ही वाचा- Amruta Fadanvis: ‘मला मामी हाक मारल्यावर फारच मज्जा येते’; बस बाई बसच्या मंचावर अमृता फडवीसांनी स्पष्टच सांगितलं आई मायेचं कवच या मालिकेत सध्या खोट्या आणि खऱ्या सुहानीने बराच गोंधळ घातला आहे. दोन सुहानी वावरत असताना खऱ्या सुहानीपर्यंत पोहोचण्यासाठी मीनाक्षी आणि भास्कर एकत्र येऊन एक योजना आखताना दिसत आहेत. खोटी सुहानी घरात तिच्या दादागिरी आणि अरेरावीने खूप उच्छाद माजवताना दिसत आहे. खऱ्या सुहानीपर्यंत पोहोचायला मीनाक्षी आता घरातल्या खोट्या सुहानीची सेवा करून तिला स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
तर दुसरीकडे खऱ्या सुहानीचा ताबा मानसिंहकडे असल्याचं दिसत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मानसिंहच्या ताब्यात असलेली सुहानी स्वतःच्या वागणुकीचा पश्चाताप करताना दिसून येत आहे तर मानसिंह तिच्या या परिस्थितीचा फायदा करून घेत मीनाक्षीला वाचवण्यासाठी मी सांगेन तसं करावं लागेल अशी कबुली घेऊन नवा प्लॅन आखताना दिसत आहे. आता मानसिंहचा प्लॅन अंमलात येण्याआधी मीनाक्षी खऱ्या सुहानीपर्यंत पोहोचणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.