मुंबई, 02 एप्रिल : छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर अनेक कलाकार मोठ्या पडद्याकडे वळतात. आज मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांमधून केली आणि नंतर मोठ्या पडद्यावर नाव कमावलं आहे. या कलाकारांमध्ये स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, प्रसाद ओक यांसारख्या मोठमोठ्या नावांचा समावेश आहे. पण मालिकांमधील कलाकारांसाठी चित्रपटात काम करणं वाटतंय तेवढं सोपं नसतं. काहींना लगेच संधी मिळते ते काहींना ती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असाच एक धक्कादायक खुलासा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याने केला आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अध्यात्मिक मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' ही आहे. ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत बाळूमामांची भूमिका अभिनेता सुमीत पुसावळे याने साकारली आहे. संत बाळूमामांच्या भूमिकेतुन सुमित घराघरात पोहचला आहे. या भूमिकेत त्याने अक्षरशः जीव ओतून काम केलं आहे. तरुणपणीच्या बाळूमामांप्रमाणेच त्याने वयस्क बाळूमामा देखील तेवढ्याच चोखपणे साकारले आहेत. अशा गुणी अभिनेत्याला मात्र चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. याबद्दलचा खुलासा सुमितने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.
VIDEO: हॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच वरुण झाला आऊट ऑफ कंट्रोल, स्टेजवर सगळ्यांसमोरच केलं ते कृत्य
सुमितला सोशल मीडियावर कमी फॉलोवर्स असल्यामुळे एका चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओसाठी नकार देण्यात आला आहे. इ टाइम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने या घटनेबद्दल खंत व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर जास्त फॉलोवर्स नसल्याने काम देण्यास नकार मिळाला यामुळे सुमित चकीत झाला. मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'मी गेली कित्येक वर्ष बाळूमामांची भूमिका साकारतोय. अनेकजण मला माझ्या भूमिकेमुळे ओळखतात. जेव्हा ते मला भेटतात तेव्हा ते मला बाळूमामा म्हणून हाक मारतात. पण माझ्यासोबत नुकतंच जे घडलं त्यामुळे मी प्रचंड दुःखी झालो आहे.'
View this post on Instagram
या घटनेबद्दल सांगताना पुढे सुमित म्हणाला कि, 'मी नुकतीच एका चित्रपटासाठी आणि म्युझिक व्हिडिओसाठी ऑडिशन दिली होती. त्यासाठी माझी निवडही झाली पण त्यानंतर माझं सोशल मीडिया अकाऊंट आणि फॉलोवर्स पाहून त्यांनी मला नकार दिला. मला काय बोलू तेच कळत नव्हतं. या घटनेमुळे पूर्णपणे हताश आलो. मला कळेच ना मी काय करू. या कारणासाठी त्यांनी मला नकार दिला. दुर्दैवाने आता कलाकाराचं भविष्य सोशल मीडिया ठरवायला लागलंय. तुम्ही किती चांगलं काम करता यापेक्षा तुमच्याकडे किती फॉलोवर्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे खूप वाईट आहे.'
पुढे सुमीत म्हणाला,'मी सध्या माझ्या पत्नीच्या मदतीने सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हिडिओ आणि रिल्स पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हे आता गरजेचं आहे असं मला वाटायला लागलंय. हे सोशल मीडिया प्रेशर नाहीये तर हे आता करावंच लागणार आहे.' अशा भावना सुमितने व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.