मुंबई, 20 जुलै : केदार शिंदे दिग्दर्शिक बाईपण भारी देवा या सिनेमानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रिलीजच्या अवघ्या काही दिवसात सिनेमानं तब्बल 50 कोटींचा टप्पा गाठला आहे. प्रत्येक स्त्री आणि पुरूषाने पाहायला हवा अशा या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी 1 कोटी रुपयांचं कलेक्शन करत साऱ्याचं लक्ष वेध आणि पाहता पाहता अवघ्या 20 दिवसात सिनेमाने 57.15 कोटींची कमाई केली आहे. वेड सिनेमानंतर बॉक्स ऑफिसवर चालणारा बाईपण भारी देवा हा या वर्षातला दुसरा सिनेमा आहे. नुकतीच सिनेमाच्या टीमची ग्रँड सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. सक्सेस पार्टीचे धम्माल व्हिडीओ समोर आलेत. सिनेमाची संपूर्ण टीम या सक्सेस पार्टीमध्ये दणकून नाचताना दिसली आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांच्या सिनेमात प्रमुख भुमिकात आहेत. या सहा जणींनी सिनेमाला चार चांद लावले आहेत. नुकतीच सिनेमाची ग्रँड सक्सेस पार्टी झाली या पार्टीमध्ये दिग्दर्शक केदार शिंदेंनी बायको बेला शिंदेबरोबर रोमँटिक डान्स केला. अंकुश झाला बायकोबरोबर रोमँटिक
तर दुसरीकडे अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब या क्यूट कपलची केमिस्ट्री देखील पाहायला मिळाली. सिनेमाच्या संपूर्ण टीमनं या पार्टीमध्ये चांगलीच धम्माल केल्याचं पाहायला मिळालं. हेही वाचा - 300 कलाकर, समोर लाखो प्रेक्षक; परदेशात मुघल-ए-आझम करायला गेलेली अनारकली भारतात येताच भावुक सुकन्या मोने पडल्या सर्वांवर भारी
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी संपूर्ण सिनेमात आपली वेगळीच छाप सोडली आहे. प्रत्येक सीनमध्ये त्यांनी जीव ओतून काम केल्याचं दिसून आलं आहे. सिनेमाच्या सक्सेस पार्टीचाही सुकन्यानं मनापासून आनंद घेतला. सुकन्या मोने यांनी डान्सची किती आवड आहे हे सर्वांनी पाहिलं आहे. सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये सुकन्या मोने यांनी ही पोरी साजुक तुपातली, कोंबडी पळाली सारख्या गाण्यावर चांगल्याच थिरकल्या. त्यांच्या एक्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पार्टीतील त्यांच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लेकीच्या गाण्यावर थिरकले केदार शिंदे
बाईपण भारी देवा सिनेमाच्या आधी महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील बहरला हा मधुमास हे गाणं सक्सेस पार्टीत वाजलं नाही तर कसं चालेल. केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांनी बहरला हा मधुमास या गाण्यावर ठेका धरला.