मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'Badhaai Do' चित्रपटाचं नवं गाणं रिलीज

VIDEO राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'Badhaai Do' चित्रपटाचं नवं गाणं रिलीज

Badhaai Do

Badhaai Do

राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या ‘बधाई दो’ (Badhaai Do)या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टाइटल ट्रॅकनंतर आता दुसरं गाणं रिलीज झालं आहे.

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या ‘बधाई दो’ (Badhaai Do)या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टाइटल ट्रॅकनंतर आता दुसरं गाणं रिलीज झालं आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तर भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुसऱ्या गाण्याची माहिती दिली आहे. 'अटक गया' असे या गाण्याचे नाव असुन हे रोमँटिक गाणे वरुण ग्रोव्हरने लिहिले आहे, अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे आणि अरिजित सिंग आणि रुपाली मोघे यांनी गायले आहे. अशी माहितीदेखील चित्रपट निर्मात्याने दिली आहे.

" isDesktop="true" id="664046" >

एलजीबीटीक्यू+ लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर ( LGBTQ+ Lesbian, Gay, Bisexual, Transgender ) समुदायाबद्दल आता बॉलिवूडमध्ये उघडपणे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमधील चित्रपटांमुळे या गहन विषयाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. दरम्यान, 'बधाई दो' या चित्रपटाची भर पडली आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. दिग्दर्शक अमित शर्माच्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा ​​स्टारर 'बधाई हो' अफाट यश मिळाले. बधाई हो या चित्रपटाचा बधाई दो हा सिक्वेल हर्षवर्धन कुलकर्णीने बनवला आहे.

याआधी हर्षवर्धनने हंटर, हसी तो फसी आणि अमेरिकी पंडित हे चित्रपट केले आहेत. 'बधाई दो' चित्रपटाच्या आशयाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट गे कॉप राजकुमार राव आणि लेस्बियन फिजिकल टीचर भूमी पेडणेकर यांच्या लव्हेंडर विवाहावर आधारित आहे.

First published:
top videos

    Tags: Bhumi pednekar, Bollywood actor, Bollywood actress, Entertainment, Rajkumar rao