मुंबई, 12 फेब्रुवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रत्येक मालिके काहींना कीही संदेश देण्याचा प्रयत्न करत असते. नकुशी (Nakushi) मालिकेतून देखील असाच विषय मांडण्यात आला होता. या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघऱात पोहचलेली अभिनेत्री प्रसिद्धी किशोर (Prasiddhi Kishor) हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिन्ह ही माहिती दिली आहे. 5 फेब्रुवारीला प्रसिद्धीने ओंकार वर्तक याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री प्रसिद्धी किशोर हिचा नवरा ओंकार वर्तक (Omkar Vartak**)** सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे ती ओंकारसोबत दुबईत स्थायिक होईल असे बोलले जात आहे. प्रसिद्धी किशोरने ओंकारसोबत मागील वर्षी साखरपुडा गेला होता. नवीन वर्षात तिनं ओंकारसोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. लग्नाचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहे. पारंपारिक पद्धती थाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
स्टार प्रवाह वरील नकुशी या मालिकेतून प्रसिद्धीने नकुशीची भूमिका साकरली होती. या मालिकेत तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. तिचं आमच्या हीचं प्रकरण हे नाटक देखील खूप लोकप्रिय ठरलं. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात प्रसिद्धीने अभिनयाची छाप सोडली आहे. लग्नानंतर ती परदेशता स्थायिक होणार का, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. वाचा- धक्कादायक प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याला विनयभंगप्रकरणी अटक प्रसिद्धी किशोर आयलवार ही मूळची नागपूरची. तिचे आजोबा गजानन आयलवार हे संगीताचे प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. तिचे काका सुधीर आयलवार हे देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. रंगस्वानंद या संस्थेची निर्मिती त्यांनी केली होती. तर प्रसिद्धीचे वडील किशोर आयलवार हे देखील नाट्यअभिनेते म्हणून ओळखले जातात.