मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘बाहुबली’मधील 1 हजार फुटांच्या धबधब्याचा सीन पाण्याशिवायच झाला होता शूट

‘बाहुबली’मधील 1 हजार फुटांच्या धबधब्याचा सीन पाण्याशिवायच झाला होता शूट

'बाहुबलीः द बिगनिंग' हा सिनेमा रिलीज होऊन आज 4 वर्ष झाली.

'बाहुबलीः द बिगनिंग' हा सिनेमा रिलीज होऊन आज 4 वर्ष झाली.

'बाहुबलीः द बिगनिंग' हा सिनेमा रिलीज होऊन आज 4 वर्ष झाली.

मुंबई, 10 जुलै : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत नवे विक्रम रचले. हे दोन्ही सिनेमां त्यांची भव्यता आणि इफेक्ट्समुळे प्रचंड गाजले. 'बाहुबलीः द बिगनिंग' हा सिनेमा रिलीज होऊन आज 4 वर्ष झाली. त्या निमित्त या सिनेमाच्या मेकर्सनी एका मुलाखतीत या सिनेमातील सीन्स शूट करताना काय काय युक्त्या कराव्या लागल्या आणि त्या सीनचं शूट कसं करण्यात आलं याविषयीची माहिती दिली. यावेळी त्यांनी या सिनेमातील 1 हजार फुटांच्या धबधब्याचा सीन कसा शूट करण्यात आला याविषयीचा खुलासा केला.

बाहुबली सिनेमातील प्रत्येक सीन हा तोलामोलाचा होता. या सिनेमातील कोणत्याही सीनची तुलना होऊ शकत नाही. पण हे सीन शूट करणं दिग्दर्शकांसाठी खूप मोठं आव्हान होतं मात्र राजामौलींनी ते लीलया पेललं. या सिनेमातील सुरुवातीचा 1 हजार फुटांच्या धबधब्याचा सीन विशेष गाजला होता. पण हा सीन शूट करण्यासाठी राजामौलींनी खूप युक्त्या लढवल्या होत्या. मेकर्सनी सांगितलं, हा सीन टिशू पेपरच्या सहाय्यानं शूट करण्यात आलं होतं. टिशू पेपर मोठ्या साइझमध्ये कापून मग ते मशीनच्या सहाय्यानं खाली सोडण्यात आले होते. तसेच या सीनसाठी अभिनेता प्रभासनं डोंगरावर चढण्यासाठीचं स्पेशल ट्रेनिंग घेतलं होतं. तसेच काही सीन हे केरळमधील लहान धबधब्यांवर शूट करण्यात आले होते. याशिवाय बर्फातील सीन शूट करण्यासाठीही टिशू पेपरचा वापर करण्यात आला होता.

ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

याशिवाय या सिनेमातील माहिष्मिती राज्याची भव्यता प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. हा सेट आतापर्यंतचा सर्वात मोठा सेट होता. या सेटची उंची ही पॅरिसमधील आयफेल टॉवर एवढी होती. या सेटसाठी राजस्थानमधील मंदिरांवर संशोधन करून मग सेटचं रेखाटन करण्यात आलं होतं. हा सेट तयार करण्यासाठी 1900 लोकांनी सलग 100 दिवस खूप मेहनत घेतली होती. बाहुबली सीरिजसाठी सर्व क्रू मेंबर पहाटे 3.30 वाजता उठत असत आणि हे सतत पाच वर्ष सुरू होतं. सिनेमातील युद्धाचे सीन शूट करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. सिनेमाचा क्लायमॅक्सचा सीन शूट करणं सर्वात कठीण होतं असं मेकर्सनी सांगितलं. या अवघ्या 2 मिनिटांच्या सीनच्या शूटिंगसाठी तब्बल 100दिवसांचा कालावधी गेला होता.

जर मला तिकीट मिळालं नाही तर तुलाही देणार नाही, दोघीही नॉमिनेट होऊ- वीणा जगताप

VIDEO : वयाच्या 43 व्या वर्षी सुश्मिता सेनचा फिटनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

=======================================================

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published:

Tags: Bahubali, Bollywood, Prabhas