• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ओळखलं का या फोटोतील मुलाला? आज आहे बॉलिवूडचा रोमँटिक हिरो!

ओळखलं का या फोटोतील मुलाला? आज आहे बॉलिवूडचा रोमँटिक हिरो!

बॉलिवूड कलाकरांच्या चित्रपटांमध्ये बॅक डान्सर म्हणून काम केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 ऑक्टोबर-  १९९९ साली आलेला 'ताल' हा चित्रपट आठवतो का? या चित्रपटाच्या संगीताने चाहत्यांवर भुरळ घातली होती. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या नृत्याने चित्रपटात चार चाँद लावले होते. अनिल कपूर,अक्षय खन्ना, अमरीश पुरी, अलोक नाथ अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटातील गाणीसुद्धा सुपरहिट ठरली होती. मात्र आज आपण एका अशा कलाकाराबद्दल पाहणार आहोत. ज्याने या चित्रपटात बॅक डान्सर (Back Dancer) म्हणून काम केलं होतं. मात्र आज हा अभिनेता बॉलिवूडमध्ये (Bollywood) टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. या फोटोतील कलाकार तोच आहे. पाहूया कोण आहे हा कलाकार.
  या फोटोमध्ये दिसणारा मुलगा इतर कोणी नसून तरुणींच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आहे. अनेकांना हा फोटो पाहून आश्चर्य वाटतं आहे. कारण सध्याच्या शाहिदमध्ये आणि फोटोतील शाहिदमध्ये अफाट फरक जाणवतो. हा जुना फोटो शाहिद कपूरच्या एका फॅन पेजवर शेअर केलेला आहे. यामध्ये शाहिद अतिशय वेगळा दिसून येत आहे. फोटोमध्ये शाहिद अंगकाठीने खूपच सडपातळ आणि वयाने लहान दिसत आहे. हा फोटो एखाद्या कार्यक्रमा दरम्यानचा दिसत आहे. कारण यामध्ये शाहिदने चकाकी असलेला बॉडीसूट परिधान केला आहे. तसेच तो आपल्या मित्रासमवेत असल्याचं दिसत आहे. शाहिद हा ज्येष्ठ अभिनेता पंकज कपूर यांचा मुलगा आहे. मात्र स्टारकीड असूनही शाहिदला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली आहे. शाहिद अभिनेत्यासोबतचं एक उत्कृष्ट डान्सर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. (हे वाचा:दुबईच्या रस्त्यावर ऐश्वर्या रॉयला भेटली पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान!) मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे, की शाहिद कपूर अभिनेता होण्याआधी बॅक डान्सर म्हणून काम करत होता. शाहिद कपूरने अनेक बॉलिवूड कलाकरांच्या चित्रपटांमध्ये बॅक डान्सर म्हणून काम केलं आहे. मात्र त्यातील एक प्रामुख्याने ओळखला जाणारा चित्रपट म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा 'ताल'होय. या चित्रपट शाहिदने ऐश्वर्याच्या मागे डान्स केलं आहे. तसेच शाहिद कपूरने अल्बम सॉंग्समध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरने २००३ मध्ये आलेल्या 'इश्क विश्क' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये अभिनेत्री अमृता राव ही त्याची सह अभिनेत्री होती. या दोघांची जोडी मोठ्या प्रमाणत पसंत करण्यात आली होती. (हे वाचा:Aryan Khan Case: NCB चा प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या घरावर छापा, आढळले अमली.) शाहिद कपूर नेहमीच चर्चेत राहिला आहे. मग त्याचे चित्रपट असो किंवा खाजगी आयुष्य. शाहिद कपूरचं अभिनेत्री करिना कपूरसोबत असलेलं प्रेमप्रकरण फारचं गाजलं होतं. या दोघांची जोडी चाहत्यांना फारच पसंत होती. मात्र काही वर्षानंतर या दोघांनी विभक्त होत सर्वांनाच धक्का दिला होता. शाहिद आणि करिनाने फिदा, जब वुई मेट, चुपके-चुपके, मिलेंगे-मिलेंगे, उडता पंजाब सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. करिनापासून विभक्त झाल्यांनतर शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. आज या जोडीला २ अपत्ये आहेत. हे दोघेही सतत सोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतात. आज शाहिद कपूरला बॉलिवूडचा कबीर खान म्हणून ओळखलं जात. या चित्रपटातून शाहिद कपूरने अक्षरशः तरुणाईला वेड लावलं आहे. चित्रपटातील गाणीसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. आज हा अभिनेता बॉलिवूडमधील टॉप कलाकारांमध्ये गणला जातो.
  Published by:Aiman Desai
  First published: