Home /News /entertainment /

पद्मिनी कोल्हापुरेने माजवली होती खळबळ;40वर्षानंतरही आठवला जातो तो विवादित प्रसंग

पद्मिनी कोल्हापुरेने माजवली होती खळबळ;40वर्षानंतरही आठवला जातो तो विवादित प्रसंग

आपल्या काळातल्या सुंदर (Beautiful) आणि बोल्ड (Bold) अभिनेत्रींमध्ये पद्मिनी कोल्हापुरेचा (Padmini Kolhapure) समावेश होत असे.

     मुंबई, 9ऑक्टोबर-   आपल्या काळातल्या सुंदर (Beautiful) आणि बोल्ड (Bold) अभिनेत्रींमध्ये पद्मिनी कोल्हापुरेचा (Padmini Kolhapure) समावेश होत असे. 'प्रेम रोग', 'इन्साफ का तराजू', 'सत्यम शिवम सुंदरम', 'वो सात दिन' यांसारख्या उत्तम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पद्मिनीला त्या काळातली महागडी अभिनेत्री मानलं जातं होतं. पद्मिनीचा 'आहिस्ता आहिस्ता' (Ahista Ahista) हा चित्रपट रिलीज होऊन 40 वर्षं झाली आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एक अशी गोष्ट घडली होती, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. याची चर्चा फक्त भारतातच नाही, तर थेट युरोपातदेखील रंगली होती. आजही या गोष्टीनं पद्मिनीचा पिछा सोडलेला नाही. 1980 सालातली ही गोष्ट आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) भारत दौऱ्यावर आले होते. त्यांना बॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग बघण्याची इच्छा झाली. तेव्हा चार्ल्सना मुंबईतल्या राजकमल स्टुडिओमध्ये नेण्यात आलं. त्याच वेळी पद्मिनी कोल्हापुरे त्या ठिकाणी आपल्या 'आहिस्ता-आहिस्ता' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी झाली होती. तिच्यासोबत अभिनेत्री शशिकलादेखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. जेव्हा प्रिन्स चार्ल्स आल्याचं पद्मिनीला समजलं, तेव्हा ती स्वतः त्यांना भेटण्यासाठी गेली. अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स यांचं औक्षण केलं आणि पद्मिनीनं गालावर किस करून गळ्यात हार घातला. त्या वेळी असं उघडपणे किस करण्याची प्रथा भारतात अजिबात नव्हती. त्यामुळे पद्मिनीच्या या किसनं मोठा गोंधळ उडाला होता. केवळ भारतातच नव्हे, तर ब्रिटनमध्येहीदेखील याची चर्चा झाली. या घटनेला चाळीस वर्षं उलटली आहेत; मात्र आजही त्याची वारंवार चर्चा केली जाते. पद्मिनीचा तो किस इतका वादात सापडला की तिच्यासाठी डोकेदुखी बनली होती. सुदैवानं त्या वेळी आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता, नाही तर किती गोंधळ झाला असता याची कल्पनादेखील करवत नसल्याचं पद्मिनी म्हणतात. अलीकडेच एनबीटीशी बोलताना पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितलं, की 'किस करताना मी काही विचार केला नव्हता. फक्त वेलकम करण्यासाठी मी गालावर किस केला होता; मात्र आजही किससंदर्भात कुठे काही झालं की कुठून तरी त्याचा संबंध माझ्या त्या किससोबत लावला जातो.'इस्माइल श्रॉफ दिग्दर्शित 'आहिस्ता आहिस्ता' या चित्रपटाला चाळीस वर्षं झाली आहेत. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरेसोबत कुणाल कपूर, शम्मी कपूर, शशिकला यांसारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटातलं 'कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता' हे गाणं आजही ऐकलं जातं.
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या