जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही’; सुरेखा सिक्री यांच्या निधनामुळे आयुषमानला बसला धक्का

‘अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही’; सुरेखा सिक्री यांच्या निधनामुळे आयुषमानला बसला धक्का

‘अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही’; सुरेखा सिक्री यांच्या निधनामुळे आयुषमानला बसला धक्का

“अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही” असं म्हणत त्याने सुरेखा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 जुलै**:** बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचं दुखद निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. (Surekha Sikri passes away) सुरेखा यांच्या निधनामुळे भारतीय मनोरंजनसृष्टी आज पुन्हा एकदा शोकसागरात बुडाली आहे. अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) याने देखील सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं. “अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही” असं म्हणत त्याने सुरेखा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता आयुषमान खुराना याने दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्यासोबत ‘बधाई हो’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी आयुषमानच्या आजीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्तानं दोघांमध्ये जणू आजी-नातवाचं नातं निर्माण झालं होतं. परिणामी सुरेखा यांच्या निधनाची बातमी कळताच त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं. चिन्मयी करतेय सावधान; ‘वागळे की दुनिया’मध्ये काम देण्याच्या बहाण्याने होतेय फसवणूक

जाहिरात

‘आता तक्रार करण्याचाही वैताग आलाय’; समीर विद्वांसनं केली रंगभूमी सुरु करण्याची मागणी “प्रत्येक चित्रपटात आमचं एक कुटुंब बनत असतं. आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा चित्रपटातील कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत असतो. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपैकी या चित्रपटात एक परिपूर्ण कुटुंब होतं, त्यात परिपूर्ण कलाकार देखील होते. सुरेखा सिक्री या आमच्या परिपूर्ण कुटुंबातील मुख्य सदस्य होत्या. त्या चित्रपटातच नव्हे वैयक्तिक आयुष्यात देखील अत्यंत प्रगतीशील विचारांच्या होत्या. मला आठवतंय, आमच्या चित्रपटाचं स्क्रिनिंग संपल्यानंतर त्या रिक्षामध्ये बसल्या होत्या. हे पाहून ताहिर आणि मी आम्ही दोघांनी त्यांना त्यांच्या घरी सोडलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की त्या आमच्या चित्रपटातील स्टार आहेत. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं…मला आणखी काम मिळालं असतं तर…” अशा आशयाची पोस्ट करत आयुषमाननं आपलं दु:ख व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात