जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ayushmann Khurrana : आयुष्मानचा ‘डॉक्टर जी' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज

Ayushmann Khurrana : आयुष्मानचा ‘डॉक्टर जी' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज

Ayushman Khurana new movie

Ayushman Khurana new movie

नेहमीप्रमाणेच काहीतरी वेगळं कथानक मांडणारा आणि महत्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आयुष्मान खुराणा घेऊन येतोय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या वेगळ्या  विषय निवडीमुळे प्रसिद्ध आहे. तो सतत हटक्या आणि महत्वाच्या  विषयांवर चित्रपट घेऊन येत असतो. पदार्पणातच त्याने ‘विकी डोनर’ या महत्वाच्या विषयावर भाष्य करत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.  त्यानंतर त्याने ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून आयुष्मानने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आता पुन्हा आयुष्मान असाच एक वेगळा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतंच त्याने याविषयी सोशल मीडियावर नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आयुष्मान खुरानाच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘डॉक्टर जी’ असं असून तो या चित्रपटात एका स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मानने ‘‘आयुष्याने उत्तम गुगली दिली आहे.  ऑर्थोपेडिक व्हायचे होते,पण झालोय ‘डॉक्टर जी’ असं म्हणत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट  14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे, त्यामुळे तो तुम्हाला हसवेल, भावूक करेल आणि प्रेक्षकांना मजा येईल.

जाहिरात

‘डॉक्टर जी’ ही एका पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञाची जीवनकहाणी असणार आहे. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल, महत्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. हेही वाचा - Sai Tamhankar : बॉलिवूडच्या ‘सिरीयल किसर’ अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी सई; नाव ऐकूण तुम्हालाही वाटेल आश्चर्य चित्रपटाच्या नावावरूनच हा एक विनोदी पद्धतीने समाजातील गोष्टींवर भाष्य करणारा चित्रपट असेल असा अंदाज लावता येऊ शकतो. आयुष्मान या चित्रपटात स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शहा यासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभूति कश्यप करणार आहे. अनुभूति ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची बहीण असून हा तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. याआधी तिने काही शॉर्ट फिल्म्स आणि ‘अफसोस’ ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्मान आणि रकुल हे दोघे प्रथमच एकत्र दिसणार आहेत. याबरोबरच आयुष्मानच्या आगामी ‘अॅक्शन हीरो’, या चित्रपटाचीदेखील सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. त्याचबरोबर आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ चा टीझरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात तो अनन्या पांडेसोबत झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात