जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ayushmann Khurrana : आयुष्यमान खुरानावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं दुःखद निधन

Ayushmann Khurrana : आयुष्यमान खुरानावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं दुःखद निधन

आयुष्यमान खुराना

आयुष्यमान खुराना

बॉलीवूड मधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान आणि अपारशक्ती खुरानाच्या वडिलांचं निधन झालं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मे :  बॉलीवूड मधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान आणि अपारशक्ती  खुरानाच्या वडिलांचं निधन झालं आहे. आयुष्मानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. अभिनेत्याच्या प्रवक्त्याने या दु:खद बातमीला दुजोरा देणारे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. आयुष्मानच्या वडिलांच नाव पी खुराणा असं असून तर प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते.  या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या निधनाने खुराना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी ऐकून आयुष्यमान आणि अपारशक्तीचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. वृत्तानुसार, आयुष्मान खुरानाचे वडील पंडित पी खुराना यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आयुष्मान आणि अपारशक्ती हे दोन्ही भाऊ त्यांच्या वडिलांच्या खूपच जवळ होते. या अभिनेत्याचे वडील पंडित पी खुराना हे ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या निपुणतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली होती. त्यांनी या क्षेत्रात प्रचंड आदर आणि सन्मान मिळवला होता.

News18लोकमत
News18लोकमत

बॉलीवूड अभिनेता अपारशक्ती खुराना यांच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या निधनाची पुष्टी केली. निवेदनात असे लिहिले आहे की, “आम्ही अत्यंत दुःखाने सांगू इच्छितो कि, आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील, ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10:30 वाजता मोहाली येथे असाध्य आजारामुळे निधन झाले. या काळात तुमच्या सर्व प्रार्थना आणि पाठींब्यासाठी आम्ही आभारी आहोत.” ‘बिग बॉस 7’ फेम अभिनेत्याची जेलमधून सुटका; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांपासून भोगत होता शिक्षा आयुष्मान खुरानाने अनेकदा आपल्या आई-वडिलांचे जुने फोटो शेअर करत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. त्याच्या यशात आपल्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे. एका जुन्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याचे दिवंगत वडील पंडित पी खुराना यांचे काही फोटो शेअर करत लिहिलं होतं कि, ‘‘आम्हाला शिस्त, संगीत, कविता, चित्रपट आणि कलेची आवड आमच्या वडिलांकडूनच मिळाली. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पण ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांना नेहमीच ओढ होती. त्यांनी आम्हाला ‘आमच्यात स्वतःचे नशीब लिहिण्याची क्षमता आहे आणि आपलं चांगलं काम कोणत्याही वाईटावर मात करू शकते’ असं नेहमीच शिकवलं. माझे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक. माझे वडील." अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. आता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून खुराना कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात