मुंबई 2 फेब्रुवारी : बॉलिवूड चित्रपट ‘आर्टिकल 15’ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर अनुभव सिन्हा कोणता नवा सिनेमा घेऊन भेटीला येणार याची प्रेक्षक अतुरतेने वाट पाहात होते. अशातच आता अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांनी स्वतःच आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘अनेक’ (Anek movie) असं या सिनेमाचं नाव आहे. विशेष म्हणजेच या सिनेमासाठी आर्टिकल 15 नंतर अनुभव सिन्हा आणि आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आर्टिकल 15 (Article 15) या सिनेमाचं जाणकारांनी मोठं कौतुक केलं. या यशानंतर आता आयुष्मान आणि अनुभव सिन्हा पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र, या सिनेमात आयुष्मानसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. अनुभव आणि आयुष्मान दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर केला आहे.
(वाचा - Bollywood Drugs Connection: NCB ने घेतले असिस्टंट डिरेक्टरला ताब्यात )
चित्रपटाच्या घोषणेसोबत सिनेमाचा फर्स्ट लूकदेखील (Anek first look) प्रदर्शित करण्यात आला आहे. आयुष्माननं सोशल मीडियावर आपला लूक शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. नुकतंच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून निर्मात्यांनी देशाच्या उत्तर पूर्व भागात चित्रपटाचं शूट करण्याचं नियोजन केलं आहे.
Excited to be collaborating with Anubhav Sinha sir. Again. #ANEK.😃🙏🏼
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) February 2, 2021
Here's presenting my look as Joshua produced by @anubhavsinha and #BhushanKumar @BenarasM @TSeries pic.twitter.com/PbhZc2hyxh
(वाचा - पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर ऋतिक ढसाढसा रडला, ‘हे’ होतं कारण )
आयुष्मानचा हा हटके लूक त्याच्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. विशेष बाब म्हणजे, अनेक हा अनुभव सिन्हांचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. अनुभव सिन्हा यांच्या मुल्क, आर्टिकल 15, थप्पड यासारख्या वेगळ्या विषयांवरील सिनेमांना समिक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळाली आहे. अनेक या सिनेमाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा करणार असून बनारस वर्क्स आणि टी सीरिजद्वारा भूषण कुमार आणि अनुभव सिन्हा या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.