मुंबई, 28 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतंच भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली आहे. या सेलिब्रेटी कपलच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या दोघांच्या हळदीपासून ते पूजेपर्यंत विविध फोटो समोर येत आहेत. दरम्यान आता नववधू अथिया शेट्टी लग्नानंतर पहिल्यांदाच घरातून बाहेर पडली आहे. परंतु अभिनेत्रीने ना सिंदूर लावलं ना मंगळसूत्र घातलं होतं हे पाहून नेटकऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अभिनेत्री गेल्या कित्येक दिवसांपासून क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. या दोघांनी सुरुवातीला आपलं नातं लपवलं असलं तरी नंतर दोघांनी सतत सोशल मीडियावरुन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. या सेलिब्रेटी कपलच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची उत्सुकता होती. अखेर नववर्षाच्या सुरुवातीलाचा या जोडप्याने लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखदः धक्का दिला आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. **(हे वाचा:** Kl Rahul-Athiya Shetty- हळदीत न्हाऊन निघाले केएल राहुल-आथिया शेट्टी; समोर आले समारंभाचे Unseen Photo ) दरम्यान अथिया शेट्टी लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसून आली. प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अथियाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अथिया जीन्स आणि टी शर्टमध्ये दिसून येत आहे. पापाराझी अभिनेत्रीला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. अभिनेत्रीनेसुद्धा त्यांना हास्य करत धन्यवाद दिलं आहे. परंतु आपल्या लुकवरून अथिया ट्रोल होत आहे.
अथिया 23 जानेवारीला केएल राहुलसोबत लग्न बंधनात अडकली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच-सहा दिवसांनंतर अथिया सार्वजनिक ठिकाणी दिसून आली. परंतु नववधू असणाऱ्या अथियाए ना मंगळसूत्र घातलं होतं ना सिंदूर लावलं होतं. अथियाचा हा कॅज्युअल अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच खटकला आहे. कमेंट करत नव्या नवरीने काही दिवस तरी मंगळसूत्र आणि सिंदूर लावावा असा थेट सल्ला नेटकऱ्यानी दिला आहे. तर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत तिला आशीर्वाद दिले आहेत.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी गेली काही वर्षे एकेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. 23 जानेवारीला या दोघांनी वडील अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील आलिशान फार्महाऊसमध्ये लग्नगाठ बांधली आहे.