भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टीने नुकतंच लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. दरम्यान आता केएल राहुल आणि अथिया शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या हळदी समारंभात हे सेलिब्रेटी कपल जल्लोष करताना दिसून आले. दोघानीं एकमेकांना हळदी लावत आपल्या खास क्षणांना आणखीनच खास बनवलं आहे. या स्टार कपलचे फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीने 23 तारखेला सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर थाटामाटात विवाह केला होता. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.