मुंबई 8 ऑगस्ट : महाराष्ट्राची लाडकी गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) तिच्या गोड आवाजासाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Little Chapms) या कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसत आहे. नुकताच आर्याने तिच्या आवजातील एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. तर तिने सुंदर रिमिक्सही केलं आहे. आर्याने ‘ओल्या सांजवेळी’ हे सुपरहीट गाणं गायलं आहे. गोष्ट प्रेमाची या चित्रपटातील हे गाणं आजही तितकचं प्रसिद्ध आहे. आर्या आपल्या आवजात या गाण्याची आणखीनच गोडी वाढवली आहे. यासोबत बहारा बहारा हे गाणंही गायलं आहे. सुंदर रिमिक्स तिने केलं आहे. आर्याचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाही फारच आवडला आहे. अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Big Boss OTT : हा प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता झळकणार बिग बॉसच्या घरात; घटस्फोटाचं कारण सांगणार?आर्या अनेकदा तिच्या सोशल मीडियावर तिच्या गोड आवाजातील व्हिडीओ शेअर करत असते. सध्या ती ‘सा रे ग म प’मध्ये दिसत आहे. तर त्यातीलही अनेक फोटो ती शेअर करत असते. आर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. लहान वयातच आर्याने आपल्या सूरांची जादू दाखवली होती. तर आता त्याचं कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसत आहे.
आर्याच्या आवाजाइतकेच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. तिला नवी क्रश म्हणून देखील तिच्या चाहत्यांनी घोषित केलं होतं. एक गायिका म्हणूनच नाही तर एक अभिनेत्री म्हणूनही आर्या ने तिची ओळख निर्माण केली आहे. ती सध्या काय करते या चित्रपटात ती दिसली होती. अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. सोशल मीडियावर आर्या फारच सक्रिय असते. 1 मिलियन हून अधिक तिचे फॉलोवर्स आहेत. याशिवाय अनेकदा ती तिच्या ‘सा रे ग म प लिटिल chapms’ च्या जजेस सोबत मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बचपन का प्यार या व्हायरल गाण्यावर व्हिडिओ बनवला होता.