Home /News /entertainment /

Sunday होणार स्पेशल! अशोक मामांची बहुरंगी कारकीर्द दिसणार 'या' स्पेशल कार्यक्रमात

Sunday होणार स्पेशल! अशोक मामांची बहुरंगी कारकीर्द दिसणार 'या' स्पेशल कार्यक्रमात

आपल्यातल्या अनेकांनी ज्यांना लहानपणापासून एकाहून एक अनेक अफलातून विनोदी पात्र साकारताना पाहिलं आहे अशा अशोक मामांचा पंचाहत्तरावा वाढदिवस (Ashok Saraf 75th Birthday) नुकताच साजरा झाला. त्यांच्या कारकिर्दीला सेलिब्रेट करणारं एक धमाल चॅलेंज सध्या अनेक कलाकारांनी घेतलं आहे. काय आहे याचं कारण?

पुढे वाचा ...
  मुंबई 1 जुलै: अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या भारताला खळखळून हसवणारं एक मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे (Ashok Saraf) अशोक सराफ. अशोक सराफ हे इंडस्ट्रीमधल्या प्रत्येकाचे मामा आहेत आणि या मामांनी त्यांच्या आयुष्याची 75 वर्ष (Ashok Saraf 75th birthday) नुकतीच पूर्ण केली. वयाच्या अमृत महोत्सवासोबत आपल्या कारकिर्दीची सुद्धा 50 वर्ष मामांनी पूर्ण केली (Ashok Saraf golden jubille of career) आणि त्याच साठी एक जंगी सेलिब्रेशन म्हणून अशोक मामांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन झी मराठीवर करण्यात आलं आहे. अशोक मामांनी 4 जून रोजी आपल्या वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केली. त्याच दिवशी निवेदिता सराफ यांनी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करत अशोक मामांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकाचंअनावरण सुद्धा या कार्यक्रमात होणार आहे. ‘बहुरंगी अशोक’ असं या कार्यक्रमाचं नाव असून मराठीतील अनेक कलाकार येऊन मामांच्या यशस्वी करिअरमधल्या खास आठवणी, काही कडक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. यासंबंधी झी मराठीच्या सोशल मीडियावर सध्या दमदार प्रमोशन होताना दिसत आहे. अनेक मराठी कलाकरांना अशोक मामांच्या काही गाजलेल्या भूमिकांच्या क्लिप्स दाखवत त्यांना त्या भूमिकेचं आणि चित्रपटाचं नाव ओळखायचं असं चॅलेंज दिल्याचं अनेक विडिओ मध्ये दिसत आहे. माझा पती करोडपती चित्रपटातील कॅप्टन बाजीराव रणगाडे, सुपरहिट अशी ही बनवाबनवी चित्रपटातला धनंजय माने, नवरा माझा नवसाचा मधील कंडक्टर लालू, गंमत जम्मत मधील फाल्गुन, एक डाव धोबीपछाड मधील दादा दांडगे, बुटाचा भाऊ मधील बंडू अशी एकाहून एक अफलातून पात्र अशोक मामांनी अमर केली आहेत.
  यातलं प्रत्येक पात्र कोणाच्या ना कोणाच्या जवळचं आहे.
  अशा पात्रांची नाव ओळखण्याचं नाव चॅलेंज कलाकरांना दिलं आहे आणि कलाकार सुद्धा ते एन्जॉय करताना दिसत आहेत. अशोक मामांनी आजवरच्या करिअरमध्ये हिंदी आणि मराठीमध्ये एक न पुसता येणारी ओळख निर्माण केली आहे. हे ही वाचा- Urmila Nimbalkar: मल्टिटॅलेंटेड उर्मिला निंबाळकरने चक्क तयार केली साडी; तिचा रेट्रो लुक बघाच!
   वयाच्या पंचाहत्तरीनंतर सुद्धा त्यांचा असलेला उत्साह, कामाबद्दल असलेली श्रद्धा आणि निष्ठा ही भल्याभल्यांना लाजवेल अशी आहे. अशोक मामा हे अनेक अर्थाने आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांचं इन्स्पिरेशन आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीवरील हा कार्यक्रम पाहायला आता सगळे चाहते उत्सुक झाले आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या