जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / NMACC कार्यक्रमात आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर, पण गौरी खाननं उघडकीस आणलं सत्य

NMACC कार्यक्रमात आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर, पण गौरी खाननं उघडकीस आणलं सत्य

NMACC कार्यक्रमात आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

NMACC कार्यक्रमात आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

मागच्या काही दिवासांपासून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अभिनेत्री अनन्या पांडेकडं दुर्लक्ष करत असल्याचे काही व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल- मागच्या काही दिवासांपासून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अभिनेत्री अनन्या पांडेकडं दुर्लक्ष करत असल्याचे काही व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय सोशल मीडियावर देखील याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. या दोघांच्यात काहीचरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू आहे. सुहाना खान आणि अनन्या पांडे चागल्या मैत्रिणी आहेत. या दोघी अनेका बॉलिवूड इंव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. यांच्यासोबत आर्यन खान देखील असतो. पण मागच्या काही दिवासात सोशल मीडियावर वेगळेच व्हिडिओ व्हायरला होताना दिसत आहेत. पण यात किती सत्य आहे हे कोणालच माहित नाही. नुकतेच मुंबईत ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चे ग्रँड ओपनिंग झाली. या कार्यक्रमता शाहरुख खानपासून सलमान खान, ऐश्वर्या, दीपिका-रणवीर, आलिया भट्ट, रेखा, प्रियांका चोप्रा यासारख्या बड्या स्टार्संनी तर हजेरी लावलीच शिवाय बॉलिवूड सेलेब्सनी देखील कार्यक्रमाची रंगत वाढवली. बॉलिवूडमधील काही स्टार किड्सनी देखील या सोहळ्यात हजेरी लावली होती. वाचा- इंडियन आयडॉलचा विजेता ऋषी सिंग बद्दल ‘या’ गोष्टी वाचून व्हाल थक्क सुहाना खान, आर्यन खान, अनन्या पांडेनं देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आर्यन खान अभिनेत्री अनन्या पांडेला इग्नोर करताना दिसत आहे. यानंतर आर्यन खानने पुन्हा अनन्याला इग्नोर केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

जाहिरात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनन्या पांडे तिच्या मैत्रिणीला म्हणजे सुहाना खानला कडकडून भेटताना दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये गौरी खान आणि आर्यनही दिसत आहेत. यादरम्यान गौरी अनन्यासोबत हसताना दिसली पण आर्यन अनन्याला इग्नोर करताना दिसला. अनन्यानेही आर्यनला दुर्लक्ष केलं. या सगळ्यानंतर या दोघांच्यात काय तरी बिनसल्याची चर्चा रंगली. पण काही वेळातच गौरी खाननं या सोहळ्यातील काही फोटो शेअर करत या सगळ्या प्रकरणाला फुलस्टॉप देत सर्व चर्चाच फेटाळून लावल्या.

News18लोकमत
News18लोकमत

गौरी खानने इंस्टावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आर्यन खान त्याची आई गौरी खान, बहीण सुहाना आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांनी एकमेकांसोबत सुंदर फोटो काढले आहेत. या सगळ्या चर्चांमध्ये एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एका फोटोत आर्यनने अनन्याच्या कमरेवर हात ठेवला आहे. या दोघांचा फोटो पाहून सर्वांच्या लक्षात आलेच असेल की, या दोघांच्यात सगळं काही ठीक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात