लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल 13’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. प्रेक्षकांकडून सर्वाधिक मतं मिळवत ऋषीने विजेतेपद जिंकलं आहे.
ऋषी सिंग हा मूळचा अयोध्या, उत्तर प्रदेशचा आहे. त्याला गाणी लिहिण्याची आणि गाण्याची नेहमीच आवड होती. ऋषी सिंग सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत आहेत.
ऋषीचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. ऋषीने इंडियन आयडॉलच्या मंचावर ऑडिशन दरम्यानच त्याने आपल्या खाजगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता.
ऋषी त्याच्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही. इंडियन आयडॉलच्या थिएटर राऊंडनंतर तो जेव्हा घरी पोहोचला होता, तेव्हा ऋषीला समजलं होतं की त्याच्या आईवडिलांना त्याला दत्तक घेतलं आहे.
याविषयी ऋषी म्हणाला होता, 'माझ्या आईवडिलांनी मला दत्तक घेतलंय. पण जर मी त्यांच्यासोबत नसतो, तर आज कदाचित मी या मंचावर पोहोचलो नसतो.'
तो पुढे म्हणाला होता कि, 'मी माझ्या आयुष्यात जितक्या चुका केल्या आहेत, त्यासाठी मी माझ्या आईवडिलांची माफी मागू इच्छितो. मला त्यांच्या रुपात जणू देवच भेटले आहेत. नाहीतर आज मी कुठे असतो याची कल्पनाच मी करू शकत नाही.'
विजेता ठरल्यानंतर ऋषीला 25 लाख रुपये आणि एक मारुती सुझुकी एसयुव्ही कार भेट म्हणून मिळाली. याशिवाय ऋषीसोबत सोनी म्युझिक इंडियाने रेकॉर्डिंगचा करारही केला आहे.