जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकाच्या आई वडिलांना भेटायला गेला अर्जुन; PHOTO समोर आल्यावर लग्नाच्या चर्चा सुरू

मलायकाच्या आई वडिलांना भेटायला गेला अर्जुन; PHOTO समोर आल्यावर लग्नाच्या चर्चा सुरू

मलायकाच्या आई वडिलांना भेटायला गेला अर्जुन; PHOTO समोर आल्यावर लग्नाच्या चर्चा सुरू

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं नातं लपून राहिलेलं नाही. ते लग्न कधी करणार याची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा सुरू व्हायला निमित्त ठरले हे फोटो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,19 फेब्रुवारी :   बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी यावर्षी लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये आता बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध कपल असलेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच नातं देखील लपून राहिलेलं नाही. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या अफेअरची चर्चा बॉलीवूडबरोबरच सोशल मीडियावरही होत असते. दोघंही अनेकदा एकत्रित दिसून येतात. दोघेही सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह असून सातत्याने आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून यामध्ये मलायका नुकतीच आपल्या आई वडिलांच्या घरी गेली होती. या फोटोंत तिच्यासोबत  अर्जुन कपूर देखील दिसून येत असून त्यांनी मलायकाच्या कुटुंबासोबत डिनर केल्याचं समोर येत आहे. या फोटोंमध्ये मलायका आणि अर्जुन बरोबरच तिची बहीण अमृता अरोरा(Amruta Arora) आणि तिचा पतीदेखील दिसत आहेत. याचबरोबर अमृताची दोन्ही मुलं देखील दिसत आहेत. या फोटोंमध्ये अर्जुन कपूर काळ्या रंगाच्या टी शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे. या भेटीवेळी मलयकाचा मुलगा अरहान खान(Arhan Khan) देखील हजर होता. त्यामुळे लवकरच कपूर कुटुंबात लग्न होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या असून, अर्जुन आणि मलायका लवकरच लग्न करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान(Arbaz Khan) यांना अरहान नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर मुलगा आई मलायकाबरोबर राहत आहे.

जाहिरात

अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांत मलायकानी आपल्या आणि अर्जुनच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे आता दोघंही लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच कदाचित तिनी अर्जुनाला आपल्या आईवडिलांशी गाठ घालून दिली असल्याचं देखील बोललं जात आहे. आपल्या घटस्फोटाविषयी बोलताना तिने प्रत्येक व्यक्तीला दुसरी संधी मिळावी असं म्हटलं होतं. त्यामुळं आता मलायका आणि अर्जुन यांचं लग्न कधी होतं याकडं चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात