मलायका अरोरा एक अभिनेत्री किंवा मॉडेल नव्हे तर ती एक जबरदस्त डान्सर, व्हीजे आणि टेलिव्हिजन रिप्रेझेंटर देखील आहे. मलायका आज तिच्या फॅशन सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप आयटम गर्ल्सपैकी एक आहे. 'छैय्या छैय्या'पासून 'मुन्नी बदनाम हुई' पर्यंतचे तिचे अनेक डान्स अफाट लोकप्रिय झाले आहेत. गाण्यांवर आजही लोक थिरकताना दिसतात. मलायका आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.
मलायका अरोरा कधीकाळी खान कुटुंबाची सून अर्थातच अरबाज खानची पत्नी होती. परंतु या दोघांनी घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगादेखील आहे. मलायका आणि अरबाज सतत आपल्या मुलासाठी एकत्र एयरपोर्टवर येतात.
सध्या मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांनां डेट करत आहेत. सुरुवातीला या दोघांनी आपलं नातं लपवलं होतं. मात्र काळानंतर या दोघांनी आपलं नातं सोशल मीडियावर ऑफिशियल केलं होतं.
अर्जुन आणि मलायका सतत सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. तसेच एकेमकांबाबत पोस्टसुद्धा लिहत असतात. दोघेही सतत एकत्र सुट्टीचा आनंद घेतांना दिसून येतात.
विशेष म्हणजे अर्जुन आणि मलायकामध्ये वयाचं मोठं अंतर आहे. परंतु तरीही त्यांचं नातं प्रचंड घट्ट आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही मलायका अतिशय फिट आणि सुंदर दिसते.
आज अनेक तरुणी मलायकाला आपली स्टाईल आयकॉन मानतात. परंतु मलायका अरोराने अनेक मुलाखतींमध्ये खुलासा करत सांगितलं आहे की, तिला मॉडेल किंवा अभिनेत्री नव्हे तर एक शिक्षिका बनायचं होतं.
मलायका शाळेत असताना अगदी टॉम बॉयसारखं वावरत असे. तिने आपले केससुद्धा अगदी मुलांसारखे ठेवले होते. इतकंच नव्हे तर ती शाळेमध्ये दादागिरीसुद्धा करत असे.