जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Anvita Phaltankar: अन्विताला कशी मिळाली गाजलेल्या चंदाची भूमिका? अभिनेत्रीने शेअर केल्या Timepass च्या आठवणी

Anvita Phaltankar: अन्विताला कशी मिळाली गाजलेल्या चंदाची भूमिका? अभिनेत्रीने शेअर केल्या Timepass च्या आठवणी

Anvita Phaltankar: अन्विताला कशी मिळाली गाजलेल्या चंदाची भूमिका? अभिनेत्रीने शेअर केल्या Timepass च्या आठवणी

चाहत्यांची लाडकी स्वीटू म्हणजे अन्विता फलटणकर ही टाईमपास 3 सिनेमात पाहायला मिळणार आहे. अन्विता पुन्हा एकदा यात चंदा पात्र साकारणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 जुलै: सध्या सगळीकडे टाईमपास 3 या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच भेटीला आला असून ट्रेलर फारच पसंत केला जात आहे. यामध्ये हृता दुर्गुळेच्या भूमिकेची बरीच चर्चा होत आहे. तसंच टाईमपासच्या आधीच्या भागातील काही पात्रं सुद्धा यामध्ये परत भेटीला येणार आहे. त्यातलंच एक पात्र आहे चंदा. हे पात्र अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) म्हणजे चाहत्यांची लाडकी स्वीटू साकारत आली आहे. पण अन्विताला हा रोल नेमका मिळाला कसा? अन्विताने टाईमपास 3 सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्या दिवशी एका मुलाखतीत जुन्या टाईमपासच्या सेटवरचे काही किस्से आणि आठवणी शेअर केल्या आहेत. तसंच चंदाच्या पात्रासाठी तिची निवड कशी झाली हे सुद्धा तिने सांगितलं. एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिने सांगितलं, “मी आधी एकदा ऑडिशन दिली होती. त्यानंतर मला सहज वाचन करायला म्हणून बोलवलं तेव्हा मी प्रथमेश आणि टाईमपासच्या टीम मेम्बरना भेटले होते. मला कल्पना नव्हती की अशी ऑडिशन घेतली जाणार आहे. माझ्या डोक्यात ऑडिशनची वेगळीच संकल्पना डोक्यात होती. त्या वाचनाच्या वेळी सगळ्यांनी एवढी धमाल केली की मलाही खूप मजा आली. आणि त्यानंतर रवी जाधव यांच्या पत्नी मेघना जाधव मला कपड्यांचं माप देण्यासाठी घेऊन आल्या आणि त्यांनी मला शूटिंगबद्दल वगरे कल्पना दिली आणि तेव्हा मालक लक्षात आलं की आपण या सिनेमाचा भाग असणार आहोत. हे ही वाचा-  Dada Ek Good News Aahe: हृताच्या जागी आलेल्या अभिनेत्रीचं फिल्मी स्वागत, प्रियाने शेअर केला स्पेशल video सेटवर वैभव मांगले, मेघना एरंडे असे कलाकार होते त्यामुळे मी थोडी घाबरले होते. तेव्हा मी अगदीच सोळा-सतरा वर्षांची होते. पण सगळ्यांनी मला आपलंस करून घेतलं. आणि टाईमपास 3 च्या वेळी रवी जाधव यांनी कॉल केला तेव्हाच काय मग चंदा अशी हाक मारली आणि मला फिल्मबद्दल विचारलं आणि मी लगेच होकारही दिला.”

जाहिरात

अन्विताने साकारलेलं हे पात्र सगळ्यांच्याच लक्षात राहिलं. चंदाचा चष्मा तिचा एकूण अवतार चाहत्यांना खूपच आवडला होता. या भागात सुद्धा अन्विताचं हे पात्र दिसून येणार असल्याने चाहते तिला पुन्हा एकदा या टीमसोबत पाहायला उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात