मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Pushpa 2: रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2'बाबत दिली मोठी अपडेट; शूटिंगबाबत म्हणाली...

Pushpa 2: रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2'बाबत दिली मोठी अपडेट; शूटिंगबाबत म्हणाली...

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 7 सप्टेंबर-  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सनी लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली होती.या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनने पुष्पा आणि रश्मिका मंदानाने श्रीविल्लीची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. लवकरच अभिनेत्री 'गुड बाय' या हिंदी चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चनयांच्या सोबत झळकणार आहे. यामध्ये त्यांनी बापलेकीची भूमिका साकारली आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रश्मिका सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं ती जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या सुपरडुपर हिट 'पुष्पा' बाबतही मोही अपडेट दिली आहे.

यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'मी एकीकडे गुडबायमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. तर दुसरीकडे पुष्पामध्ये अल्लू अर्जुन सरांसोबत काम करत आहे. मी याबाबत काय बोलू, मी माझं स्वप्न जगत आहे. असं म्हणत अभिनेत्रीने पुष्पा २ बाबत सांगितलं की, येत्या दोन दिवसांत ती 'पुष्पा-द रुल' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

(हे वाचा:गर्दी पाहून घाबरला अजय देवगणचा लेक; लालबागच्या राजाच्या दर्शनाचा VIDEO आला समोर )

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर, पुष्पा 2 च्या सेटवरील पूजेचा एक फोटो शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. तसेच या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसनेदेखील चित्रपटाबाबत मोठी अपडेट शेअर केली होती. यामध्ये अभिनेता फहाद फाजिल पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर चाहत्यांना श्रीविल्लीच्या भूमिकेबाबत जाणून घेण्याची उत्सुकता होती. आता रश्मिकाने आपण शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगत चाहत्यांना दिलासा दिला आहे. बंधू भगिनी

First published:

Tags: Allu arjun, Entertainment, Rashmika mandanna