मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विराट कोहलीच्या खराब कामगिरीमुळे अनुष्कावर होतेय टीका;अभिनेत्रीच्या समर्थनात उतरल्या मुमताज

विराट कोहलीच्या खराब कामगिरीमुळे अनुष्कावर होतेय टीका;अभिनेत्रीच्या समर्थनात उतरल्या मुमताज

परंतु गेल्या काही दिवसांपासून विराटच्या मैदानावरील खराब कामगिरीला पत्नी अनुष्का शर्माला जबाबदार धरलं जात आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून विराटच्या मैदानावरील खराब कामगिरीला पत्नी अनुष्का शर्माला जबाबदार धरलं जात आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून विराटच्या मैदानावरील खराब कामगिरीला पत्नी अनुष्का शर्माला जबाबदार धरलं जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. हे दोघे सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून विराटच्या मैदानावरील खराब कामगिरीला पत्नी अनुष्का शर्माला जबाबदार धरलं जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडसना ट्रोलिंगचा सामना का करावा लागतोय यावर वाद सुरु आहे. यामध्ये आता ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी अनुष्काला पाठिंबा देत आपलं मत व्यक्त केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सना सोशल मीडियावर ट्रोल केल्या जाणाऱ्या संस्कृतीबाबत भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी 60-70 च्या दशकातली वातावरण कसं वेगळं होतं. आणि त्याकाळात क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सना कसं ट्रीट केलं जात होतं. याबाबतही संवाद साधला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांनी नुकतंच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 60-70 च्या दशकात जेव्हा, क्रिकेटर मन्सूर अली पतौडी किंवा मोहसीन खान मैदानावर खराब कामगिरी करत होते. तेव्हा शर्मिला टागोर किंवा रीना रॉय यांना कधीच जबाबदार धरलं गेलं नाही. त्यांच्यावर कधीच लोकांनी टीका केली नाही. हे फक्त त्याकाळात सोशल मीडिया नव्हतं म्हणून नव्हे तर तो काळच वेगळा होता. आत्ताचं वातावरण फार बदललं आहे.त्यांनी पुढे सवाल करत म्हटलं, जेव्हा क्रिकेटर मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करतात तेव्हा तुम्ही त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडचं कौतुक का नाही करत?'सोबतच त्यांनी या गोष्टीला समाजात रुजलेल्या लिंगभेदाचं प्रतिबिंबदेखील म्हटलं आहे'.

(हे वाचा:16 व्या वर्षी सलमानने केलंय टायगर श्रॉफच्या आईसोबत काम; थ्रोबॅक VIDEO पाहून सर्वच चकित )

अनुष्का शर्मानेसुद्धा या टीकांवर वारंवार चोख उत्तर दिलं आहे. मध्यंतरी माजी भारतीय क्रिकेटर आणि कॉमेंटेटर सुनील गावस्कर यांनीदेखील अनुष्का आणि विराटवर टीका केली होती. त्यानंतर अनुष्का शर्माने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत,' आपल्याला क्रिकेटमध्ये ओढण्याचा लोकांचा अट्टाहास कधी थांबणार?' असा प्रश्न विचारला होता.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood News, Entertainment, Virat kohali