जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 16 व्या वर्षी सलमानने केलंय टायगर श्रॉफच्या आईसोबत काम; थ्रोबॅक VIDEO पाहून सर्वच चकित

16 व्या वर्षी सलमानने केलंय टायगर श्रॉफच्या आईसोबत काम; थ्रोबॅक VIDEO पाहून सर्वच चकित

16 व्या वर्षी सलमानने केलंय टायगर श्रॉफच्या आईसोबत काम; थ्रोबॅक VIDEO पाहून सर्वच चकित

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या 34 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सलमान खानच्या पहिल्या चित्रपटाबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या 34 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सलमान खानच्या पहिल्या चित्रपटाबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. अभिनेत्याने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. परंतु त्याच्या पहिल्या जाहिरातीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ‘कॅम्पा कोला’च्या जाहिरातीत पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसला होता.सध्या हा थ्रोबॅक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या जाहिरातीची विशेष गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा हॅन्ड्सम हंक अभिनेता टायगर श्रॉफची आई आणि अभिनेते जॅकी श्रॉफच्या पत्नी आयशा श्रॉफने सलमान खानसोबत काम केलं आहे. आयशा श्रॉफ यांनी स्वतः ही जुनी जाहिरात इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खानचे चाहते फारच चकित झाले आहेत. कारण या व्हिडीओमध्ये सलमान खान सध्यापेक्षा फारच वेगळा दिसून येत आहे. टायगर श्रॉफची आई आयशा यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, “जेव्हा जीवन सोपं आणि मजेदार होतं…जाणून आनंद झाला की ते परत येत आहे. हा व्हिडिओ काही तासांपूर्वी शेअर करण्यात आला आहे.त्याला 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खान आणि आयेशा श्रॉफ या दोघांनाही ओळखणं कठीण जात आहे.

जाहिरात

(हे वाचा: Seema Sajdeh: ‘या’ कारणामुळे झाला सोहेल खानचा घटस्फोट; EX-पत्नी सीमाचा मोठा खुलासा **)** मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही जाहिरात 1983 मध्ये अंदमान बेटाजवळ शूट करण्यात आली होती. हा व्हिडीओ चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनाही खूप आवडला आहे. अभिनेत्री दिशा पाटनी आणि सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांनी व्हिडिओवर कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या जाहिरातीमधून सलमान खान पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात