मुंबई, 28 ऑगस्ट: अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी शेअर केलेला एक VIDEO सध्या चर्चेत आहे. ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या मुलांनी घरगुती टाकाऊ गोष्टी वापरून तयार केलेली वाद्य आणि त्यावर वाजवलेला बँड आहे खरा छानच. हा VIDEO शेअर करताना तो भारतातल्या एका छोट्या गावातल्या मुलांचा असल्याचं म्हटलं आहे. ‘असली पावर दिल मे होती है’ असं म्हणत या मुलांचा त्यांनी जयजयकारही केला आहे. पण या VIDEO ची सत्यता पडताळून पाहताना तो भारतातला नाहीच, असं समोर आलं आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेला ग्रामीण भागातल्या मुलांचा हा जुगाड मिल्ट्री बँडचा VIDEO आहे पाकिस्तानातला. एका छोट्या खेड्यातली वाटणारी ही मुलं रिकामे डबे, ड्रम, चमचे, थाळ्या अशा वस्तूंमधून सुंदर नाद निर्माण करत खरोखरच्या बँडसारखं वादन करतानाचा हा video आहे.
अनुपम खेर यांनी हा VIDEO शेअर करून मुलांचं कौतुक केलं. ‘इन बच्चोंकी जय हो. किधर है ये बच्चे’ असंही त्यांनी लिहिलं. दुसऱ्या एका शेहझाद रॉय नावाच्या यूजरने अनुपम यांच्या पोस्टला रिप्लाय करत हा video मुळात आपण शेअर केलेला जुना व्हिडीओ असल्याचं सांगितलं. मी या मुलांना ओळखतो. त्यांच्या संपर्कात आहे आणि ती मुलं पाकिस्तानातल्या एका गावातली असल्याचा खुलासाही शेहझाद यांनी त्यांच्या tweet वर केला. अनुपम खेर यांनी शहजाद यांच्या ट्वीटची दखल घेत लगेचच आपली चूक मान्य करत पुन्हा एकदा मुलांचं कौतुक केलं आणि तुम्ही चांगलं काम करत असल्याची पावतीही शहजाद यांना देऊन टाकली.
NCB च्या रेडदरम्यान फिल्मी स्टाइल फरार अभिनेता अखेर अटकेत
खरं तर ही मुलं वाजवत असलेली धून ऐकून कुठल्याही भारतीयाचा ही मुलं आपल्याच देशातली असल्याचा गैरसमज होऊ शकतो. ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की….‘ची धून असली तरी पण खरं तर ही मुलं हुंझा नावाच्या पाकिस्तानी गावातली आहेत आणि ते वाजवत असलेलं गाण त्याच चालीचं पाकिस्तानी गीत आहे.
Old video of children in a village in Hunza, Pakistan playing music on tin cans and other waste material was shared as India. The assumption was made based on the song they were playing. But the song also has a Pakistani version. #AltNewsFactCheck https://t.co/YPZyDxU9RJ
— Mohammed Zubair (@zoo_bear) August 18, 2021
Alt News आणि इतर काही Fact Check करणाऱ्या वेबसाइट्सनीदेखील अनुपम खेर यांना त्यांची चूक दाखवून दिली. हा video खरं तर अनेक दिवस सोशल मीडियामधून फिरत होता. तो कुठला आहे, कुणाचा आहे याबद्दल माहिती न घेताच लोक तो फॉरवर्ड करत असल्याने viral झाला होता. प्रत्यक्षात तो पाकिस्तानचा असल्याची बाब अनुपम खेर यांनी तो शेअर केल्यानंतर उघड झाली.

)







