मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'कुछ कुछ होता है' च्या त्या सर्वाधिक memes होणाऱ्या सीनबद्दल अनुपम खेर यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

'कुछ कुछ होता है' च्या त्या सर्वाधिक memes होणाऱ्या सीनबद्दल अनुपम खेर यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

करण जोहरचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'कुछ कुछ होता है'(Kuch Kuch Hota Hai). हा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. अशातच या चित्रपटातील कायम चर्चेत असलेला सीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याविषयी अभिनेता अनुमप खेर (Anupam Kher) यांनी पोस्ट शेअर केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 28 जुलै : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यातील काही सीन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून जातात. सोशल मीडियावरही अनेकदा त्याची चर्चा पहायला मिळते. एवढंच काय तर त्याचे अनेक मीम्सही व्हायरल होतात. असाच एक चित्रपट म्हणजे करण जोहरचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'कुछ कुछ होता है'(Kuch Kuch Hota Hai). हा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. अशातच या चित्रपटातील कायम चर्चेत असलेला सीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याविषयी अभिनेता अनुमप खेर (Anupam Kher) यांनी पोस्ट शेअर केली आहे.

'कुछ कुछ होता है' चित्रपटातील अनुपम खेर यांचा बेडवरचा सीन कायम चर्चेत असतो. ते बेडवर वेगवेगळ्या स्टाईलनं बोलताना दिसतात. या सीनचा एक कोलाज केलेला फोटो अनुमप खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोट शेअर करत अनुमप खेर यांनी म्हटलं की, 'जेव्हा मी कुछ कुछ होता है या सीनसाठी शूट केले, तेव्हा मिस्टर मल्होत्रा ​​आणि मिसेस ब्रिगांझा यांच्यात फोनवर झालेला हा सामान्य संवाद होता. पण मी हा सीन सुधारत वेगवेगळ्या पोझीशनमध्ये ट्राय केला. वेगवेगळ्या पोझ दिल्या, बेडवरुन पडलोही.'

हेही वाचा -  'Bigg Boss 16'च्या घराचे फोटो Leak; यंदाचा सीजन असणार 'या' थीमवर आधारित

अनुपम खेर पुढे म्हणाले की, 'जेव्हा ते सीन शूट करत होते, तेव्हा सेटवरील प्रत्येकजण हसत होता त्यांना वाटलं मी वेडा वगैरे झालो की काय. याचा कधीच विचार केला नव्हता की हा सीन सगळयात जास्त मीम्समध्ये वापरला जाईल'. जवळपास सगळ्याच परिस्थितींसाठी हा वापला जातो. सोशल मीडियावरही अनेकदा आपल्याला हा सीन दिसतोच दिसतो. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रया उमटताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अलीकडेच करण जोहरने त्याच्या आयकॉनिक सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है'च्या रिमेकबद्दल वक्तव्य केलं होतं. करण जोहरने सांगितलं की, जर त्याने भविष्यात कुछ कुछ होता है चा रिमेक बनवला तर आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि जान्हवी कपूरला अंजली, राहुल आणि टीनाच्या भूमिकेत कास्ट करेन. त्यामुळे या तिघांना एकत्र पाहण्यासाठी आणि कुछ कुछ होता है चा रिमेक पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.

दरम्यान, अनुपम खेर त्यांच्या आगामी 'कागज' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याचा हा 526 वा चित्रपट असेल. याशिवाय अनुपम खेर कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

First published:

Tags: Anupam kher, Bollywood, Bollywood actor, Entertainment, Karan Johar, PHOTOS VIRAL, Social media