Home /News /entertainment /

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल

हॉटशॉटवर (Hotshot) तसेच गहना वशिष्ठ (Gehana Vashisht) आणि आणखी 4 निर्मात्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   मुंबई 28 जुलै: राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होतान दिसत आहेत. तर राजच्या अडचणीतही दिवसेंनदिवस वाढ होताना दिसत होत आहे. 27 तारखेला झालेल्या सुनावनीत न्यायालय़ाने राजला आणखी 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. तर आता राजच्या कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. यावेळी राजवर गुन्हा दाखल न होता त्याच्या कंपनीवर, हॉटशॉटवर (Hotshot) तसेच गहना वशिष्ठ (Gehana Vashisht) आणि आणखी 4 निर्मात्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मॉडेल आणि अभिनेत्रीने हा गुन्हा दाखल केला आहे. या मॉडेलने क्राइम ब्रँचला दिलेल्या माहितीनुसार तिला मोठ्या चित्रपटाचं लालच दाखवून एका अडल्ट (Adult movie)  चित्रपटात काम करवून घेतलं होतं. यानंतर पोलिसांनी तिला एपआयआर दाखल करण्यास सांगितलं कारण ही घटना मालवनी परिसरात घडली होती.

  HBD : एका मोबाईल जाहिरातीने बदललं दिल्लीच्या तरुणीचं जीवन; हुमा कुरेशी अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

  View this post on Instagram

  A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

  या केसमध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठं नाव देखील सामिल आहे. जिने मागील काही दिवसांत राजची पाठराखण केली होती. या शिवाय काही निर्मात्यांची नावंही आहेत. हॉटशॉटचं नाव आहे ज्याचा मालक राज कुंद्रा आहे. मालवनी पोलिस स्थाकात ही केस नोंदवली गेली आहे. पुढे तिचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात येणार आहे.
  दरम्यान काही महिने पोलिस कोठडीत काढलेल्या गहनाला पुन्हा एकदा पोलिसांनी समन्स बजावले आहेत. मात्र आपली तब्येत ठिक नसल्याचं कारण देत ती चौकशीला गैरहजर राहिली आहे. याशिवाया राजला नुकतीच 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty

  पुढील बातम्या