जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD : एका मोबाईल जाहिरातीने बदललं दिल्लीच्या तरुणीचं जीवन; हुमा कुरेशी अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

HBD : एका मोबाईल जाहिरातीने बदललं दिल्लीच्या तरुणीचं जीवन; हुमा कुरेशी अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

HBD : एका मोबाईल जाहिरातीने बदललं दिल्लीच्या तरुणीचं जीवन; हुमा कुरेशी अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

अभिनेत्री हुमा कुरेशीचा वाढदिवस असल्याने जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 28 जुलै : अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. केवळ झिरो फिगर अभिनेत्रीच बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम करू शकतात याला छेद देत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली. हुमाचा आज वाढदिवस जाणून घ्या हुमाविषयी खास गोष्टी. हुमाचा जन्म 28 जुलै 1986 ला दिल्लीत झाला होता. एका हॉटेल व्यावसायिक कुटुंबात तिचा जन्म झाला होता. तिच्या वडिलांचे दिल्लीत हॉटेल्सचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचे 10 हॉटेल्सची मोठी चैन आहे. हुमाने दिल्लीतच आपलं शिक्षणही पूर्ण केलं होतं. पण अभिनयात रस असल्याने तिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थिएटर ग्रुप जॉइन केला होता. तिथे तिने अभिनयाचे अनेक धडे घेतले.

‘सैराट’मधील आर्चीवर ‘धडक’ फेम मधू फिदा! शाहीदच्या भावाची ही कमेंट ठरतेय लक्षवेधी

2008 साली हुमा आपल्या स्वप्नांच्या शोधात स्वप्न नगरी मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक ऑडिशन्स द्यायला सुरूवात केली. एका मित्राच्या ओळखीने तिने जंक्शन या चित्रपटाचं ऑडिशन दिलं. तिची निवडही झाली मात्र तो चित्रपट झालाच नाही.

जाहिरात

त्यानंतर हुमाने जाहीरातींत काम शोधायला सुरुवात केली. तिला काही जाहीरातीत काम करण्याची संधीही मिळाली. तिला हिंदुस्थान युनिलिव्हरचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ज्यानंतर तिने अनेक जाहिरतींत काम केलं. पण एक जाहीरात अशी मिळाली ज्यानंतर तिचं आयुष्य बदलून गेलं. तिने अभिनेता आमिर खानसोबत एक जाहीरात शुट केली. व त्यानंतर तिला अभिनेता शाहरुख खानसोबतही काम करण्याची संधी मिळाली.

अभिनेता आमिर खानसोबत जाहीरात शुट करत असताना दिग्दर्शक अनुराग कश्यपने हुमाला पाहिलं होतं. व तिचं अबिनय कौशल्य त्याने पारखलं होतं. त्यानंतर अनुरागने तिला गँग्स ऑफ वासेपूर ऑफर केलं. यानंतर हुमाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अनेक हिट चित्रपट तसेच सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. याशिवाय आता ती केवळ बॉलिवूड पर्यंतच मर्यादित न राहता हॉलिवूडमध्येही गेली आहे. ‘आर्मी ऑफ द डेड’ या चित्रपटात काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात