मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मी दीपिका किंवा आलिया नाही, कंबर हलवत बसत नाही सरळ हाडं तोडते; कंगनाचा काँग्रेस आमदाराला टोला

मी दीपिका किंवा आलिया नाही, कंबर हलवत बसत नाही सरळ हाडं तोडते; कंगनाचा काँग्रेस आमदाराला टोला

कंगनानं आमदाराला प्रत्युत्तर देत ट्वीट केलं आहे, की हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कॅटरिना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिनं आयटम नंबर करण्यास नकार दिला.

कंगनानं आमदाराला प्रत्युत्तर देत ट्वीट केलं आहे, की हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कॅटरिना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिनं आयटम नंबर करण्यास नकार दिला.

कंगनानं आमदाराला प्रत्युत्तर देत ट्वीट केलं आहे, की हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कॅटरिना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिनं आयटम नंबर करण्यास नकार दिला.

मुंबई 20 फेब्रुवारी : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीनं आता बैतूलच्या मुलताई विधानसभेचे काँग्रेस आमदार (Congress MLA) सुखदेव पानसे यांच्यावर पलटवार केला आहे. पानसे यांनी अभिनेत्रीला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. याचं सणसणीत उत्तर अभिनेत्रीनं दिलं आहे. आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडत असल्याचं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ट्वीटमध्ये अभिनेत्री म्हणाली, हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कॅटरिना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिनं आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी मोठे अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते.

काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांनी नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी कलेक्टरच्या समोरच कंगनाला नाचणारी-गाणारी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी सारनीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या आगामी धाकड सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यासाठी पोहोचले होते. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

या लाठीचार्जनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. याच घटनेचा विरोध करण्यासाठी काँग्रेस रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचलं होतं. निवेदन देताना पांसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. पांसे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, की पोलिसांनी कंगनाच्या हातची कठपुतली बनायला नको. कारण सरकारं येत जात राहातात.

कंगनानं मागेच शेतकरी आंदोलनावर ट्वीट करत दिल्ली हिंसा करणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. यानंतर काँग्रेसनं हाच मुद्दा बनवला. कंगनाच्या या वक्तव्याचा बैतूल जिल्ह्यात काँग्रेसनं दोन दिवस विरोध करत प्रदर्शन केलं आणि कंगनावर माफी मागण्यासाठी दबावही टाकला. मात्र, काँग्रेसच्या दबावानंतरही अभिनेत्री माफी न मागता ट्वीट करतच राहिली.

First published:

Tags: Farmer protest, Kangana ranaut