मुंबई, 8 ऑगस्ट- ‘कोण होणार करोडपती’ नंतर आता बहुप्रतीक्षित हिंदी कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’चासुद्धा नवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमिताभ बच्चन आवाज पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर घुमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान बॉलिवूड परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने या शोचा पहिला पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती. अभिनेत्याने आपल्या आगामी लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही उपस्थिती लावली होती. या शोमध्ये आमिर खानने आपल्या या चित्रपटाच्या शूटिंगबाबत काही माहिती नसलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो आहे. आपल्या ज्ञानाच्या जोरावर अनेक सर्वसामान्य लोकांनां आपलं नशीब पालटण्याची संधी या शोमुळे सहज शक्य होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या या शोची प्रचंड क्रेज आहे.यंदा या शोच्या 14 व्या सीजनची जोरदार सुरुवात झाली आहे. अभिनेता आमिर खान, रिटायर्ड मेजर डीपी सिंह आणि कर्नल मिताली मधुमिता यांनी शोच्या पहिल्या भागात हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांना अनेक चकित करणारे किस्से ऐकायला मिळाले. दरम्यान आमिर खाननेसुद्धा आपल्या आगामी चित्रपटाबाबत माहिती नसलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. ‘लाल सिंह चढ्ढा’ बाबत बोलताना आमिर खानने सांगितलं, ‘या चित्रपटाचं शूटिंग केरळमधील जटायूपारा इमारतीजवळ करण्यात आलं आहे’. बहुतेकांना माहिती नसेल ही इमारत जगातील सर्वात मोठ्या इमारतींपैकी एक आहे. ही इमारत कोल्लम जिल्ह्यातील चंदयामंगलममध्ये उभारण्यात आली आहे. आमिरनं पुढं सांगितलं की, ‘त्याची इच्छा होती की, या चित्रपटाचं शूटिंग अशा ठिकाणी व्हायला हवं ज्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. कारण जेव्हा प्रेक्षक चित्रपट बघतील तेव्हा त्यांनाही समजायला हवं कि आपल्या देशात इतक्या सुंदर संरचनासुद्धा आहेत’. (हे वाचा:
VIDEO: सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने शाहरुखसोबत केलं असं काही; भडकला अभिनेता, आर्यनने केलं शांत
**)** टायू अर्थ सेंटरमध्ये जटायूची प्रचंड उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्त्यांपैकी एक आहे. रामायणानुसार, जटायू हा पक्षी या दगडावर कोसळला होता. त्यामुळे याठिकाणाला पवित्र रुप देण्यात आलं आहे. कारण जटायूने आपल्या प्राणाची आहुती देऊन सीतेचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना रामायणात विशेष महत्व आहे. अशा ठिकाणी लाल सिंह चढ्ढाचं शूटिंग करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.