जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हिंदी TV गाजवल्यानंतर अंकुश चौधरीच्या बायकोचं मराठी टेलिव्हिजनवर जोरदार कमबॅक!

हिंदी TV गाजवल्यानंतर अंकुश चौधरीच्या बायकोचं मराठी टेलिव्हिजनवर जोरदार कमबॅक!

हिंदी TV गाजवल्यानंतर अंकुश चौधरीच्या बायकोचं मराठी टेलिव्हिजनवर जोरदार कमबॅक!

मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपा परबनं मोठ्या काळानंतर मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै: झी मराठीवर (Zee Marathi) अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या मालिकेसह जुने कलाकार पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपा परब ( Deepa Parab) दीपा परबनं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र गेली अनेक वर्ष तिनं मराठी टेलिव्हिजनकडे पाठ फिरवली होती. या काळात तिनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत हिंदी टेलिव्हिजनवर आपली नवी ओळख निर्माण केली. परंतू मराठी टेलिव्हिजनशी जोडलेली नाळ कधी तुटत नाही त्यामुळे आता मोठ्या गॅपनंतर दीपा परब मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीवरच्या ‘तु चाल पुढं’ ( Tu Chal Pudh) या मालिकेत दीपा परब मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून  दीपाचा नवा लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दीपा परब ही मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी आहे ( Ankush Chaudhari Wife) अंकुश चौधरीनं देखील दीपाच्या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपा परब ही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आहे.  झी मराठीवरील अनेक मालिकांमध्ये तसेच जाहीरातीत दीपानं काम केलं आहे.   दीपाच्या मराठीतील कमबॅकनं सगळेच खूश झाले असून दिग्दर्शक केदार शिंदे, क्षितीज पटवर्धन, अभिनेत्री भार्गवी चिरमुले सारख्या अनेक कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे. मराठी टेलिव्हिजनवर येणारी दीपाची नवा मालिका तु चाल पुढं ही सर्वसामान्य गृहिणींची असामान्य कथा सांगणारी मालिका आहे.  ‘तू चाल पुढं’ तुला गं सखे साथ तुझ्या आत्मविश्वासाची…. गोष्ट एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची…’ अशा टॅग लाईनसह मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मालिकेत मराठीतील अनेक ओळखीचे आणि काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. हेही वाचा - ‘सोनाली नही फायर है तू’; केस रंगवलेले, मादक अदा पाहा सोनाली कुलकर्णीचा अनोखा अंदाज

जाहिरात

हिंदी टेलिव्हिजनवर दीपानं स्टार प्लस वाहिनीवर ‘शौर्य और अनोखी की कहानी’ या मालिकेत काम केलं आहे. मालिकेत तिनं साकारलेली ‘आस्था’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.  2020मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धनश्री काडगावकरचं कमबॅक तुझ्यात जीव रंगला ( Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून वहिनीसाहेब म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर ( Dhanashree Kadgaonkar) मोठ्या ब्रेकनंतर टेलिव्हिजनवर परतली आहे. मुलाच्या जन्मानंतर धनश्रीने कामातून ब्रेक घेतला होता. मात्र ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.  नव्या मालिकेतही धनश्री खलनायिकेच्याच भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात