मराठीतील 'अप्सरा' अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. सध्या ती आगामी चित्रपटामुळे व्यस्त आहे.
2/ 9
सतत चर्चेत असणारी सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' च्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. सोशल मीडिया असेल, रेडिओ असेल, रिअॅलिटी शो असेल अशा अनेक गोष्टींच्या आधारे ती चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
3/ 9
'तमाशा लाइव्ह' च्या प्रमोशनसाठी केलेला सोनालीचा प्रत्येक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच तिचा 'चला हवा येऊ द्या' मधील नवीन लुक समोर आला आहे. तिचा हा लुक सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
4/ 9
नव्या लुकमध्ये सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सोनालीनं तिच्या नव्या लुकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
5/ 9
सोनालीच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहत्यांनी 'सोनाली नही फायर है तू, खूप सुरेख, सुंदर लुक आहे', अशा अनेक कमेंट करत सोनालीचं कौतुक केलं आहे.
6/ 9
सोनालीचा आगामी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' येत्या 15 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
7/ 9
संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाइव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
8/ 9
सोनाली या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकरणार आहे.
9/ 9
सोनाली नेहमीच धाटणीच्या भूमिका साकारत असते. नव्या भूमिकेत ती चाहत्यांच्या अपेक्षवर कितपत खरी उतरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.