मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Deepa Parab: बायकोच्या कमबॅकवर अंकुश चौधरीची सॉलिड प्रतिक्रिया; म्हणाला...

Deepa Parab: बायकोच्या कमबॅकवर अंकुश चौधरीची सॉलिड प्रतिक्रिया; म्हणाला...

दीपा परब ही अभिनेत्री अवघ्या चौदा वर्षांनी पुन्हा एकदा मालिका क्षेत्रात पाऊल टाकताना दिसत आहे.

दीपा परब ही अभिनेत्री अवघ्या चौदा वर्षांनी पुन्हा एकदा मालिका क्षेत्रात पाऊल टाकताना दिसत आहे.

दीपा परब ही अभिनेत्री अवघ्या चौदा वर्षांनी पुन्हा एकदा मालिका क्षेत्रात पाऊल टाकताना दिसत आहे.

  मुंबई 12 ऑगस्ट: झी मराठीवर सध्या अनेक नव्या मालिकांची नांदी होताना दिसत आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी वाहिनी सध्या जोमाने काम करत असून येत्या काळात एका मोठ्या अभिनेत्रीचा झी मराठीच्या मालिकेतून टीव्ही जगतात कमबॅक होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे (deepa parab ankush chaudhari) दीपा परब. दीपा परब एक प्रख्यात अभिनेत्री असून अंकुश चौधरीची पत्नी आहे. दीपा अनेक वर्षांनी ‘तू चाल पुढं’ मालिकेतून टीव्ही जगतात दिसून येणार असल्याने त्यांच्या कमबॅकवर अंकुश चौधरीची नेमकी प्रतिक्रिया काय होती हे जाणून घ्यायला चाहते उत्सुक झाले आहेत. दीपा परब हे नाव तसं इंडस्ट्रीसाठी नवं नाही. दीपा यांच्या कमबॅकने चाहते जसे खुश झालेत तशीच काहीशी प्रतिक्रिया अंकुशने सुद्धा दिल्याचं खुद्द दीपा यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. राजश्री मराठीशी बोलताना दीपा यांना अंकुशने नेमकी काय प्रतिक्रिया दिली याबद्दल विचारणा झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं, “अंकुशला जेव्हा हे कथानक कळलं, स्टोरी काय आहे हे समजलं त्याला ते फारच आवडलं. त्याने मला तू हे नक्कीच करायला हवंस असं सांगितलं. तुझ्याकडे ही भूमिका करून दाखवायची क्षमता आहे तर ती वाया घालवू नकोस असं सुद्धा त्याने मला आवर्जून सांगितलं. तसंच माझ्या मुलाला सुद्धा गोष्ट फार आवडली. हे ही वाचा- Amruta Khanvilkar : मराठमोळी चंद्रमुखी थिरकली धक धक गर्ल माधुरीसोबत; दाखवणार नृत्याचा अविष्कार असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषमागे एक स्त्री असते पण यशस्वी स्त्रीमागे संपूर्ण कुटुंब असतं. मलाही असाच सपोर्ट माझ्या कुटुंबीयांनी केला. माझा मुलगा मोठा होत असताना त्याच्याजवळ राहून मी लक्ष देत होते. पण आता त्याची, घराची जबाबदारी सांभाळत मी पुन्हा कामाकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. आहेत त्या जबाबदाऱ्या सांभाळत मी शूटिंग सुद्धा करत आहे.” दीपा यांची मालिकेतील भूमिका सगळ्या गृहिणींना जवळची वाटेल अशीच आहे. एखादी गृहिणी संसारासोबत स्वतःची स्वप्नं सुद्धा पूर्ण करू शकते अशा अनोख्या कथानकावर आधारित ही मालिका 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
  मालिकेचं जोरदार प्रमोशन सुद्धा सध्या सुरु आहे. दीपा परब सह यामध्ये धनश्री काडगावकर पुन्हा एकदा खलभूमिकेत दिसणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या