मुंबई, 02 मार्च : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीप्रमाणेच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही (Ankita lokhande) ट्रोल झाली. गेल्या काही दिवसांपासून अंकिताचे सोशल मीडियावरी व्हिडीओ (ankita lokhande video) पाहून सुशांतचे चाहते तिला लक्ष्य करत आहेत. या ट्रोलर्सना अंकिता आता अक्षरश: वैतागली आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत या ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.
अंकिता लोखंडे सोमवारी इन्स्टाग्राम (ankita lokhande instagram) अकाऊंटवर लाइव्ह आली. तिथं तिनं आपला राग व्यक्त केला. अंकिता कोणतेही व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते तेव्हा सुशांतचे चाहते तिला काहीही बोलतात आणि त्यामुळे अंकिता वैतागली आहे. ती तिथं तर व्यक्त व्हाययची नाही. पण अखेर आता तिनं लाइव्ह येतच याचं उत्तर दिलं.
View this post on Instagram
अंकिता म्हणाली, "जे लोक माझ्याकडे बोट दाखवत आहेत त्यांना माझ्या रिलेशनशिपबाबत काही माहिती नाही. तुम्हाला इतकं प्रेम होत मग तुम्ही आता का लढत आहात. आमच्या आयुष्यात जेव्हा सर्वकाही संपत होतं तेव्हा तुम्ही कुठे होता? आज मला दोष दिला जातो आहे, पण माझी काही चूक नव्हती. प्रत्येकाचं आयुष्यात एक ध्येय असतं. सुशांतला नेहमी आयुष्यात पुढे जायचं होते जे त्यानं केलं. तो त्याच्या मार्गानं निघून गेला. पण त्यासाठी मी चुकीची आहे का? मला का त्रास जात आहे? मी काय चुकीचं केलं? तुम्हाला माझ्याबाबत माहिती नाही त्यामुळे मला दोष देणं बंद करा. हे खूप वेदनादायी आहे"
हे वाचा - शिवसेनेकडून जीवाला धोका, खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवावे, कंगनाची मागणी
"मीसुद्धा डिप्रेशनचा सामना केला आहे पण मी हे कुणाला सांगितलं नाही. मी खूप वाईट परिस्थितीत होते. मलासुद्धा खूप त्रास झाला होता. खूप रडायला आलं होतं. तेव्हा माझ्यासोबत कुणी नव्हतं, माझं कुटुंब माझ्यासोबत होतं आणि माझे काही चाहते जे आजही माझ्यासोबत उभे आहेत", असंही अंकिता म्हणाली.
"मला दोष देणं बंद करा. कारण मी या सीनमध्ये कुठेच नाही. इतक्या वर्षांपासून मी कुणाच्या आयुष्यातच नव्हते. पण त्याच्याप्रती माझी एक जबाबदारी होती जी मी योग्यप्रकारे पूर्ण केली. जर तुम्हाला मी आवडत नसेल तर मला फॉलो करणं बंद करा", अशी विनंतीही तिनं ट्रोलर्सना केली आहे.
हे वाचा - स्टार किड असूनही एकेकाळी जमिनीवर झोपायची आली वेळ, मेहनतीच्या जोरावर कमावलं नाव
अंकिता आणि सुशांत पवित्र रिश्ता या टीव्ही सीरिअलच्या माध्यमातून एकत्र आले. दोघंही सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर सुशांत रियासोबत रिलेशनमध्ये होता तर अंकिता बिझनेसमन विक्की जैनसोबत. अंकि ाआणि विक्कीनं साखरपुडाही केले आहे. लवकरच दोघं लग्नही करणार आहेत.
14 जून, 2020 मध्ये सुशांतचा मृत्यू झाला. मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूचा धक्का अंकितालाही बसला. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी तिनंही खूप प्रयत्न केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.