मुंबई 14 फेब्रुवारी : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या विकी जैनसोबतच्या (Vicky Jain) आपल्या रिलेशनशिपमुळं चर्चेत असते. अंकिता विकी जैनसोबतचे आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपलं प्रेम जगासमोर व्यक्त करत असते. सार्वजनिक ठिकाणी असो किंवा एखादी पार्टी अंकिता नेहमीच विकीसोबत स्पॉट होत असते. अशात आता व्हॅलेंटाईन वीकमध्येही (Valentine's Day) अंकिता आणि विकी एकमेकांसोबत खास वेळ घालवण्यासाठी व्हॅकेशनवर गेले आहेत.
अंकितानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती विमानतळाच्या ब्रीजवर पोज देताना दिसत आहे. तर, व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी जैन विमानानं प्रवास करताना दिसत आहेत. हा एक बूमरँक आहे, जो अंकितानं शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अंकितानं कॅप्शनमध्ये लिहिलं, एनरूट सोबतच तिनं विमानचं इमोजी शेअर करत ओके बाय असंही लिहिलं आहे.
यात अंकितान पांढऱ्या रंगाच्या स्वेटशर्ट आणि काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेता यात अंकितानं मास्क लावल्याचंही दिसत आहे. अंकिता आणि विकी जैन गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा हे दोघंही सोशल मीडियावर एकमेंकांसोबतचे फोटो शेअर करत असतात आणि एकमेकांसाठी खास कॅप्शनही लिहित असतात.
काही दिवसांपूर्वीच अंकितानं विकी जैनसाठी एक मोठी पोस्ट लिहिली होती. यात तिनं विक्कीला आपली सर्वात मोठी सपोर्ट सिस्टिम म्हटलं होतं. या पोस्टनंतर अंकिता लोखंडे सोश मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.