हॉलीवूडमध्ये पोहोचला कोरोना, बडा अभिनेता आणि त्यांच्या बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह

हॉलीवूडमध्ये पोहोचला कोरोना, बडा अभिनेता आणि त्यांच्या बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह

  • Share this:

न्यूयॉर्क12 मार्च : हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. हे दोघेही काही कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेले होते. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी ही लक्षणं दिसू लागली. त्यांनी कोरोनाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आलेय. टॉम हँक्स यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिलीये. टॉम हँक यांच्या माहितीनंतर त्यांच्या फॅन्सना धक्का बसलाय.

टॉम हँक्स यांनी आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपट केले असून ते जगभर गाजले आहेत. त्यांना दोन वेळा ऑस्कर हा मानाचा पुरस्कारही मिळला होता. टॉम हँक यांचे कास्ट अवे, फॉरेस्ट गम्प, कॅच मी इफ यू कॅन, द टर्मिनल असे अनेक चित्रपट गाजलेत. त्यामुळे टॉम हँक यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

टॉम यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलंय. ते म्हणाले, आम्ही दोघं ऑस्ट्रेलियाला गेले होते, त्यानंतर आम्हाला ताप आला आणि अंगही दुखायला लागलं होतं. त्यानंतर आम्ही कुठलाही वेळ न घालवता टेस्ट करून घेतली. त्यानंतर ती पॉझिटीव्ह निघाली. आता आम्ही कोरानासाठी तयार केलेल्या खास वॉर्डमध्ये आहोत. उपचार सुरु आहेत. निष्काळीपणा न करता काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरकडे जा आणि टेस्ट करा असला सल्लाही त्यांनी दिलाय.

संबंधित - कोरोनाची लस घ्या, लाखो रुपये घेऊन जा; लसीच्या ह्युमन टेस्टसाठी ऑफर

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी केरळमध्ये गेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कडक पाऊल उचलण्यात सुरुवात केली आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकाने व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे. 13 मार्च मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

संबंधित - 'कोरोना'मुळे IPL रद्द होणार? 48 तासांत सौरव गांगुली मोठा निर्णय घेण्याची शक्यता

केंद्र सरकारने  कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.  पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

15 फेब्रुवरी 2020 नंतर चीन, इटली, इराण, कोरिया गणराज्य, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये गेलेल्या भारतीयांसह येणाऱ्या सर्व पर्यटकांना 14 दिवस वैद्यकीय तपासणीच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे.

First published: March 12, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या