मुंबई, 30 जुलै : सुशांत सिंह मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणात बिहार पोलीस मुंबईत दाखल झाली असून त्यांनी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्याकडून बरी माहिती जमा केली आहे. यावेळी अंकितानेही पुराव्यासह अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहे. अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले की सुशांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता. आणि ही गोष्ट स्वत: सुशांतने आपल्या वाढदिवशी अंकिताला सांगितली होती. अंकिताने सुशांतसोबत झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटही पोलिसांना सुपूर्त केला आहे. रियाला सुशांतने अंकितासोबत संपर्कात राहणे आवडत नव्हत. ब्रेकअपनंतरही अंकिता सुशांतच्या संपर्कात होती. मात्र ही गोष्टी रियाला आवडत नव्हती. सुशांतच्या मृत्यूनंतर या सर्व गोष्टी तिने सुशांतची बहीण नीतू यांना सांगितल्या होती. अंकिताने पोलिसांना सांगितले की सुशांतने त्याच्या डिप्रेशनबाबत तिला कधीच काहीच सांगितलं नव्हतं. हे वाचा- SSR Suicide : CBI तपासाची गरज नाही, मुंबई पोलीस सक्षम- गृहमंत्री शेवटच्या बातचीतमध्ये सुशांत म्हणाला होती की, त्याला बिहारमधील 100 मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा आहे. अंकिताने याबाबत सविस्तर माहिती बिहार पोलिसांनी दिली. अंकिताशी पोलिसांनी 50 मिनिटांपर्यंत विचारपूस केली आणि त्यानंतर अंकिताच्या जॅग्वोर गाडीत टीम निघून गेली. हे वाचा- सुशांत आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, बिहार पोलीस पोहोचले अंकिता लोखंडेच्या घरी बिहार पोलिसांना सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतंही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे चक्क रिक्षातून प्रवास करत बिहार पोलीस अंकिता लोखंडे हिच्या घरी दाखल झाले होते. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य दिलं जात नसल्याचं समोर येत आहे. दुसरीकडे गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस या प्रकरणाच तपास करणार सीबीआयची गरज नसल्याचं वक्तव्य केलं होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.