मुंबई, 30 जुलै : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushsnat singh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात दरदिवशी नवनव्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे. बिहारमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवती हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता बिहार पोलीस थेट मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर बिहार पोलीस आता सुशांतसिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड अंकित लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या घरी पोहोचले आहेत. बिहार पोलिसांना सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतंही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे चक्क रिक्षातून प्रवास करत बिहार पोलीस अंकिता लोखंडे हिच्या घरी दाखल झाले. अंकिताच्या घरी का पोहोचले पोलीस? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी इतके दिवस शांत राहिलेल्या त्याच्या कुटुंबाने थेट गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप केल्यानंतर आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही खळबळजनक आरोप केला आहे. रिया आपला छळ करत असल्याचं सुशांतने आपल्याला सांगितलं होतं, असं अंकिता लोखंडे म्हणाली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहारमधील पाटणा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता लोखंडेने रियाबाबत सुशांतसह झालेल्या आपल्या संवादाचे मेसेज शेअर केलेत. मणिकर्णिका फिल्मच्या प्रमोशनवेळी अभिनंदनासाठी सुशांतने अंकिताला मेसेज केला होता. त्यावेळी दोघांमध्ये बरंच बोलणं झालं. अंकिताला केलेल्या मेसेजमध्ये सुशांतने आपण रियासह रिलेशनशिपमुळे त्रस्त असल्याचं सांगितलं. त्याला हे नातं संपवायचं होतं, कारण रिया त्याचा खूप छळ करत होती.आता या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कंगनानेही केला आरोप रियाने सुशांतचे पैसे लुटले त्याची आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या वस्तू बळाकावल्या असं त्याच्या वडीलांनी सांगितलं आणि आता अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) सुशांतची गॅझेट्स अजूनही रियाकडेच आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.