कोल्हापूरच्या मातीत चित्रित होत असलेली 'तुझ्यात जीव गुंतला' हि मालिका सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या मल्हार आणि श्वेताची लगीनघाई सुरु आहे. मात्र लग्ना आधी होत असणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही खुलासे होत आहेत.
नुकताच मालिकेच्या सेटवरून मल्हारच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले होते. मात्र आत्ता मालिकेच्या सेटवरून काही नवीन फोटो समोर आले आहेत. त्यानुसार सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे.
मालिकेमध्ये मल्हारचं लग्न श्वेतासोबत नव्हे तर अंतरासोबत होणार असल्याचं कळत आहे. कारण मल्हार-अंतराचे लग्न जोड्यातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मात्र खरच असं होणार कि, आणखी काही ट्विस्ट येणार हे मालिका पहिल्यांनंतरच समजेल.
कलर्स मराठीवर 'तुझ्यात जीव गुंतला' हि मालिका आपल्या भेटीला येते,. मालिकेत मुख्य अभिनेत्याचं लग्न मुख्य अभिनेत्रींच्या बहिणीशी म्हणजेच श्वेताशी ठरलेलं आहे. मात्र श्वेताने अंतराच्या पत्रिकेच्या मदतीने आपलंलग्न जुळवलं आहे.
तसेच श्वेताचं आधीच कॉलेजमधील मेघ या मुलाशी प्रेमप्रकरण असतं. मात्र मल्हारची संपत्ती पाहून ती लग्नाला होकार देते. आणि तिकडे मेघाची फसवणूक करत राहते. शिवाय अंतरा आणि मल्हारचा असा गैरसमज करून देते कि तो मुलगा तिच्या पाठीमागे पडला आहे. आणि तिला जबरदस्ती त्रास देत आहे.
या सर्व गैरसमजातुन अंतरा आणि मल्हार त्या मुलाचा शोध घेत असतात. मात्र नव्या प्रोमोमध्ये अंतराच्या समोर श्वेताच्या पत्रिकेचं सत्य येत. त्यामुळे आत्ता हे लग्न होणार नाही इतकं तर नक्की. सध्या समोर आलेल्या फोटोनुसार खरंच अंतरा आणि मल्हारच लग्न होणार कि हासुद्धा काही ट्विस्ट आहे. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.